टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी

पाणी हे जीवन आहे. एकवेळ माणूस अन्न नाही मिळालं म्हणून उपाशी राहू शकतो. पण पाणी नाही मिळालं तर माणूस जगू शकणार नाही. त्यामुळे पाण्याला जास्त महत्त्व आहे. इगतपुरीतल्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. पण त्यांच्या या संघर्षाची जाणीव मनसेच्या पाणीदुताला झाली आणि त्यांनी या आदिवासी पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्धार केला आहे.

टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी
टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : पाण्यासाठीचा वनवास संपला, इगतपुरीच्या आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचलं पाणी
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 3:48 PM

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. पण काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा फार वणवा आहे. एकीकडे प्रचंड कडाक्याचं ऊन, दुसरीकडे भीषण पाणीटंचाई. या भयानक पाणीटंचाईमुळे माणसं जिथे पाणी मिळेल तिथून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे ही परिस्थितीत साक्षात इगतपुरीमध्ये आहे. या भागात पाऊस दरवर्षी चांगला पडतो. पण पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे आदिवासी पाड्यांमध्ये आज भीषण पाणी टंचाई आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’कडून दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. या बातमीची दखल घेत मनसेचे पाणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण हे आज आदिवासी पाड्यांवर टँकर घेऊन पोहोचले. इगतपुरी येथील नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती शिवारातील आदिवासी पाड्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मनसेचे पणीदूत म्हणून ओळख असलेले मनोज चव्हाण यांनी मार्गी लावला आहे.

आदिवासी बांधवांना डोंगर दऱ्यातून जीव मुठीत घेऊन गढूळ झिऱ्यातील पाण्याने तहान भागवावी लागत होती. आदिवासी बांधवाना होणाऱ्या त्रासाबाबत टीव्ही 9 मराठीवर वृत्त प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर मनोज चव्हाण हे आज स्वतः टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहोचले. विशेष म्हणजे आता या आदिवासी पाड्यांना पावसाळा सुरु होईपर्यं टँकरने पाणी पुरवठा करणार, असा निश्चय मनोज चव्हाण यांनी केला आहे. मनोज चव्हाण यांच्या या मदतीमुळे आदिवासी बांधवाना पाणी मिळालं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळालं.

‘महाराष्ट्रात 65 टक्के दुष्काळ’

यावेळी मनोज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “टीव्ही 9 मराठीवर दोन दिवसांपूर्वी बातमी बघितली आणि इथे पोहचलो. गेली दहा वर्ष मराठवाडा आदिवासी भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणून गेली दहा वर्ष मी टँकर पूरवण्याचं काम करतोय. काल आमच्या लोकांना पाहणी करायला सांगितली. त्यांनी पाहणी केली. या वाड्यांमध्ये पाण्याची परिस्थिती खूप खराब आहे. महाराष्ट्रात 65 टक्के दुष्काळ पडलेला आहे. तो सांगितला जाणार नाही. जिथे पाणी नाही अशा 56 गावातील लोकांनी मला संपर्क केला, अशा ठिकाणी आमचं पाणी पोहचविण्याचं काम चालू आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज चव्हाण यांनी दिली.

मनोज चव्हाण यांची लोकप्रतिनिधींवर टीका

“लोकांना पाणी कसं मिळणार? ही भूमिका नाही. टक्केवारीत जास्त लक्ष असल्याचं दिसून येतंय. अनेक योजना राबविल्या जातात. पाईपलाईन येऊन पडते. मात्र काम पूर्ण होत नाही हे दिसून आलंय. लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचे हे महत्वाचं आहे. फोडाफोडीचे राजकारणात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. जनतेच्या कामाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीय, असंच बघितलं पाहिजे यातून काही निष्कर्ष लागत नाही”, अशी टीका मनोज चव्हाण यांनी केली.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.