नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नाशिक दौरा रद्द (Cancelled) झाला आहे. अमित शहा यांच्याऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय (Nityanand Roy) नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झालेलं असताना दौरा अचानक रद्द झाला आहे. अग्निपथ योजनेवरून देशात वातावरण तापल्याने दौरा रद्द झाल्याची सूत्रांकडून माहिती कळते. अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जून रोजी नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र अग्निपथ योजनेवरुन वाढता रोष पाहता हा दौरा रद्द केल्याची माहिती मिळते.