“ज्या पक्षात जन्म, तिथेच अखेरचा श्वास” शिवसेनेत घरवापसीनंतर सुनील बागुल यांच्या भावना

सुनील बागुल आणि वसंत गीते समर्थकांनी नाशिक शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. (Vasant Gite Sunil Bagul Shivsena)

ज्या पक्षात जन्म, तिथेच अखेरचा श्वास शिवसेनेत घरवापसीनंतर सुनील बागुल यांच्या भावना
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 4:50 PM

नाशिक : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा शिवसेनेत पुनर्प्रवेश झाला. त्यानंतर दोन्ही नेत्यांचं नाशिक शिवसेना कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. “ज्या पक्षात जन्म झाला, त्याच पक्षात आता शेवटचा श्वास घ्यायचा आहे” अशा भावना यावेळी सुनील बागुल यांनी व्यक्त केल्या. (Vasant Gite Sunil Bagul joins Shivsena again quits BJP)

या स्वागत समारंभापूर्वी सुनील बागुल आणि वसंत गीते समर्थकांनी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. सुनील बागुल आणि वसंत गीते हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने सेनेतून त्यांच्या जाण्याने गटातटाचं राजकारण सुरु होतं. मात्र या दोन्ही नेत्यांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं चित्र होतं.

“शिवसेनेतून गेल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात. दुसऱ्या पक्षाच्या भाषणातही शिवसेनेचं उदाहरण द्यायचो. भाजपातील कामं ही सरकारी कामासारखी होती. शिवसेनेत थेट काम करायची पद्धत आहे. ज्या पक्षात जन्म झाला, त्याच पक्षात आता शेवटचा श्वास घ्यायचा आहे.” अशा भावना सुनील बागुल यांनी व्यक्त केल्या.

वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला होता. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

गीते-बागुल मधल्या काळात दुसऱ्या पक्षात गेले होते. मात्र अनुभवसमृद्ध होऊन ते परत आले आहेत. शिवसैनिक शिवसेनेत परत आले आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती. इकडे तिकडे झालं होतं. पण आता ही जुनी-नवी मंडळी एकत्र आल्यानंतर नाशिकवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

‘जिथे भेळ, तिथे खेळ’; गीते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

वसंत गीते आणि सुनील बागुलांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

(Vasant Gite Sunil Bagul joins Shivsena again quits BJP)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.