AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची रणनिती ठरली, विधानसभेला ‘या’ चेहऱ्यांना संधी; पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची अपडेट

BJP Strategy For Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी भाजपने रणनिती ठरवली आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाचा सविस्तर...

भाजपची रणनिती ठरली, विधानसभेला 'या' चेहऱ्यांना संधी; पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची अपडेट
नरेंद्र मोदी, अमित शाहImage Credit source: ANI
| Updated on: Aug 20, 2024 | 11:12 AM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या अशातच सगळ्याच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. रणनिती आखली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ स्तरावर बैठका होत आहेत. घडामोडींना वेग आला आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी समाजाला समोर ठेवून भाजप रणनिती आखत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात यंदाची निवडणूक लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात पंकजा मुंडे, नारायण राणे आणि आशिष शेलार या नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षतपद रिक्त होत आहे. या पदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? अशी चर्चा असतानाच याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

भाजपची रणनिती ठरली

भाजपची विधानसभेसाठी रणनीती ठरल्याची माहिती आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला भाजप वापरणार आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतं आहे. मराठा मतदार, ओबीसी मतदार आणि दलित आदिवासी मतदारांना भाजपकडे वळवण्याची रणनीती आहे. देवेंद्र फडणवसींच्या नेतृत्वात चारही नेते काम करणार आहेत. लवकरच चारही नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होणार आहेत. याच चेह-यांवर विधानसभेचा डाव खेळला जाणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पराभवानंतर भाजप आता पूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार या नेत्यांवर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. तर पक्षाध्यक्षपदाबाबत आताच निर्णय घेतला जाणार नसल्याचं कळतं आहे.

भाजप अध्यक्षपदाबाबत महत्वाची अपडेट

भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष नवीन वर्षात मिळणार असल्याची माहिती आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत जे. पी. नड्डा अध्यक्ष राहणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होईपर्यंत पक्षाध्यक्ष बदलाचे कुठलेही संकेत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.