VIDEO : एपीएमसी मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी, क्षुल्लक कारणामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण

नवी मुंबईच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये क्षुल्लक कारणामुळे तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. (APMC Market businessman beaten)

VIDEO : एपीएमसी मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी, क्षुल्लक कारणामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण
APMC Market businessman beaten


नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये क्षुल्लक कारणामुळे तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. ओपन शेडमध्ये अनाधिकृत व्यापारासाठी जागा न दिल्याने एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (APMC Market businessman beaten)

आंबा व्यापारासाठी जागा न दिल्याने मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला ओपन शेड बांधण्यात आली आहे. या ओपन शेडमध्ये अनधिकृत आंबा व्यापारासाठी जागा दिली नाही, म्हणून एका व्यापाराला मारहाण करण्यात आली. तब्बल 10 ते 20 जणांकडून त्या व्यापाऱ्याला मारहाण केली गेली.

या मारहाणीत तो व्यापारी गंभीररित्या जखमी झाला. या घटनेनंतर एपीएमसी मार्केट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला बाजूला केले. तसेच मारहाण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याचा पुढील तपास सुरु आहे. (APMC Market businessman beaten)

संबंधित बातम्या :

मुंबई एपीएमसीत मास्क घेण्यासाठी कोरोना नियम धाब्यावर, संचालकही फोटो काढण्यात मग्न

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सराईत गुन्हेगारांचा अड्डा, घरफोड्यांचे 30 गुन्हे दाखल असणाऱ्यांना बेड्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI