AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khalapur Landslide : भवर आणि पारधी कुटुंबावर काळाचा घाला; खालापूर दरड दुर्घटनेतील मृत आणि जखमींची यादी

आजही कुदळ, खोरं आणि फावड्याच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येत आहे. प्रचंड मोठा ढिगारा उपसण्याचं आव्हान जवानांसमोर आहे. पाऊस पडत असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे.

Khalapur Landslide : भवर आणि पारधी कुटुंबावर काळाचा घाला; खालापूर दरड दुर्घटनेतील मृत आणि जखमींची यादी
landslide Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 11:09 AM
Share

खालापूर | 21 जुलै 2023 : खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत अजूनही शोधकार्य सुरू आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती आहे. या गावातील 150 लोकांचा अजूनही शोध लागत नसल्याने हे लोक ढिगाऱ्याखाली दबले तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी युद्धपातळीवर शोधकार्य हाती घेण्यात आलं असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.

खालापूर दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख दीपक तिवारी यांनी सांगितलं. यातील 13 जणांची ओळख पटली आहे. अजून तिघांची ओळख पटलेली नाहीये. मृतांमध्ये पारधी आणि भवर कुटुंबातील सर्वाधिक सदस्य आहेत. तसेच जखमींना नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मशीन्स वर जात नसल्याने अडथळे

या ठिकाणी अद्याप शोधकार्य सुरू आहे. या शोधकार्यत पावसाची मोठी अडचण येत आहे. मात्र एनडीआरएफच्या चार टीमकडून शोधकार्य सुरूच आहे. या टीमला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आजच्या शोधकार्यत अद्याप कोणताही मृतदेह हाती लागला नसून शोधकार्य सुरूच आहे. मोठ्या मशिन्सवर जात नसल्याने सुद्धा एनडीआरएफला बचावकार्य करताना अडथळे निर्माण होत आहेत, अशी माहिती दीपक तिवारी यांनी दिली.

सर्वत्र चिखल, स्थानिकांची मदत

दरम्यान, आजही कुदळ, खोरं आणि फावड्याच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येत आहे. प्रचंड मोठा ढिगारा उपसण्याचं आव्हान जवानांसमोर आहे. पाऊस पडत असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे हा ढिगारा उपसण्यात अडचणी येत आहेत. जवानांसोबत स्थानिक नागरिकही मदतीला धावून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंतच्या शोधमोहिमेत एकही मृतदेह हाती लागलेला नाहीये.

मृतांची नावे

  1. रमेश भवर, वय 26
  2. जयश्री भवर, वय 22
  3. रुद्रा भवर, वय एक वर्ष
  4. विनोद भवर, वय 4
  5. जिजा भवर, वय 36
  6. दामा भवर, वय 40
  7. राधी भवर, वय 37
  8. अंबी पारधी, वय 45
  9. बाळू पारधी, वय 52
  10. सुमित पारधी, वय 3
  11. सुदाम पारधी, वय 18
  12. चंद्रकांत जाधव, वय 37
  13. बाळी भुतांब्रा, वय 70

जखमी आणि उपचार घेत असलेले रुग्णालय

  1. प्रवीण पारधी, एमजीएम रुग्णालय
  2. रामी पारधी, चौक ग्रामीण रुग्णालय
  3. कमळी पारधी, चौक ग्रामीण रुग्णालय
  4. यशवंत डोरे, एमजीएम रुग्णालयात
  5. मनिष डोरे, चौक ग्रामीण रुग्णालय
  6. भगवान भवर, चौक ग्रामीण रुग्णालय
  7. हरी भवर, चौक ग्रामीण रुग्णालय
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.