विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ, उद्या 100 केंद्रावर 37 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन

महानगरपालिकेने दिव्यांगांचा विचार करून पहिल्या डोसप्रमाणेच दुसऱ्या डोसचीही काळजी घेत विशेष लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल दिव्यांग व्यक्तींनी तसेच त्यांच्या संस्था, संघटना पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ, उद्या 100 केंद्रावर 37 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन
विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ

नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तींना ईटीसी सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या नामांकित केंद्रांच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या सक्षमीकरणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. याच दिव्यांग कल्याणकारी दृष्टीकोनातून कोव्हिड लसीकरणातही नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना रांग न लावता लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये कोव्हिडच्या संभाव्य तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना लसीकरणाद्वारे संरक्षित करण्याच्या दृष्टीने 17 जून रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरीता कोव्हिड लसीकरणाचे विशेष सत्र 3 रूग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. (98 persons with disabilities benefit from special immunization session, more than 37,000 immunizations planned tomorrow)

दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महापालिका

18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका होती. या विशेष लसीकरण सत्राला दिव्यांग व्यक्तींचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर योग्य कालावधी झालेला असल्याने दुसऱ्या डोसकरीता त्याच 3 रूग्णालयांत दिव्यांगांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 18 वर्षावरील 80 दिव्यांग व्यक्तींनी दुसरा डोस तसेच 18 दिव्यांग व्यक्तींनी पहिल्या डोस घेतला. अशाप्रकारे एकूण 98 दिव्यांगांनी लसीकरण सत्राचा लाभ घेतला. सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजित या सत्रांमध्ये सकाळपासूनच दिव्यांग व्यक्तींनी उत्साही उपस्थिती दर्शविली.

आज दिवसभरात तीन लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील एकूण 98 दिव्यांग व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने दिव्यांगांचा विचार करून पहिल्या डोसप्रमाणेच दुसऱ्या डोसचीही काळजी घेत विशेष लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल दिव्यांग व्यक्तींनी तसेच त्यांच्या संस्था, संघटना पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने शनिवारी, 18 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या 100 लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांच्या पहिल्या डोसकरीता 37 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचसोबत दुसऱ्या डोसच्या कालावधीचीही काळजी घेत सोमवारी, 20 सप्टेंबर रोजी 12 हजारहून अधिक लसीकरण 100 केंद्रावर करण्यात येणार आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यंत सुरक्षित असलेली कोव्हीड लस घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. (98 persons with disabilities benefit from special immunization session, more than 37,000 immunizations planned tomorrow)

इतर बातम्या

पालघरच्या समुद्र किनारी बॉम्ब सदृश्य वस्तू, धूर निघत असल्याने स्थानिक मच्छीमारांना धडकी, एकच खळबळ

केंद्र सरकारडून मोबाईल सिमकार्डशी संबंधित नियमांत बदल, जाणून घ्या सर्वकाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI