AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरच्या समुद्र किनारी बॉम्ब सदृश्य वस्तू, धूर निघत असल्याने स्थानिक मच्छीमारांना धडकी, एकच खळबळ

पालघर तालुक्यातील कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिली.

पालघरच्या समुद्र किनारी बॉम्ब सदृश्य वस्तू, धूर निघत असल्याने स्थानिक मच्छीमारांना धडकी, एकच खळबळ
पालघरच्या समुद्र किनारी बॉम्ब सदृश्य वस्तू, धूर निघत असल्याने स्थानिक मच्छीमारांना धडकी, एकच खळबळ
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 9:44 PM
Share

पालघर : येत्या नवरात्रीचं निमित्त साधून आयसीसच्या दहशतवाद्यांचा देशातील विविध भागांमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आलीय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 9 अतिरेक्यांना अटक केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. पण राज्यासह देशभरातील नागरिक आता अलर्ट झाले आहेत. मुंबईत 26/11 चा जो हल्ला झाला होता तेव्हा अतिरेकी हे पाकिस्तानातून समुद्रमार्गाने आले होते. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूीमीवर समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार हे सावध झाले आहेत. या दरम्यान पालघरच्या समुद्र किनारी मच्छिमारांच्या मनात धडकी भरवणारी घटना घडली. संबंधित परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. यावेळी त्या वस्तूमधून धूर निघत असल्याने मच्छिमारांचा संशय आणखी बळावला.

नेमकं प्रकरण काय?

पालघर तालुक्यातील कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी बॉम्ब डिटेक्शन डिसपोजलच्या साहाय्याने संबंधित स्फोटकीय वस्तू निष्क्रिय केली.

नेमकं काय घडलं?

केळवे सागरी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या कोरे या गावी बुधवारी (15 सप्टेंबर) समुद्र किनाऱ्यावरील खडकात एक बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली. त्यामधून धूर निघत असल्याचं मच्छीमारांनी बघितलं. स्थानिक मच्छीमारांनी तातडीने वेळ न दडवता सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना याबाबतची माहिती दिली. भीमसेन गायकवाड हे माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी पाहणी केल्यावर साधारणपणे 2 फुटाची ती वस्तू होती. त्यावर मार्कर असे लिहिले होते. तसेच सदर वस्तूमध्ये फॉस्फरस असल्याने ही सामग्री हाताळू नका, असा संदेश इंग्रजीत लिहिलेला होता. ही वस्तू ज्वलनशील असल्याने गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधत बॉम्ब डिटेक्शन डिसपोजल पथकाला पाठविण्याची विनंती केली.

अखेर स्थानिकांनी सूटकेचा श्वास सोडला

काही वेळाने स्कॉड आल्यानंतर त्यांनी त्या वस्तूची तपासणी केली. यावेळी संबंधित बॉम्ब सदृश्य वस्तू रुट मार्कर असल्याचे स्पष्ट झाले. या वस्तूमध्ये असलेल्या फॉस्फरसचा हवेशी संपर्क आल्यास ती वस्तू पेट घेते. त्यामुळे ही वस्तू माणसाच्या सहवासात आल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. त्यामुळे स्कॉडने ती वस्तू जाळून निष्क्रिय केली. त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी 150 तरुणांची सागरी रक्षक दल आणि पोलीस मित्रांची टीम आपण उभी केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा :

दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार

रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.