राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी

राज्यात ओढवलेल्या पूरग्रस्तांना महापालिकेमार्फत 1 कोटी मदत देण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. महापालिका आयुक्त यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी
Manda mhatre navi mumbai municipal

नवी मुंबई : राज्यात ओढावलेल्या पूरग्रस्तांना 1 कोटी रुपये द्या. तसेच मोडकळीस आलेल्या इमारती व डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करा, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहोचेल असेही त्यांनी सूचित केले आहे. (Give Rs 1 crore to the flood victims through the municipal corporation demand from MLA Manda Mhatre)

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतंच भेट घेतली. राज्यात ओढवलेल्या पूरग्रस्तांना महापालिकेमार्फत 1 कोटी मदत देण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. महापालिका आयुक्त यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

सीवूड्स से-50 येथे शासकीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणेकरिता भूखंड हस्तांतरित करणे, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करणे, मोडकळीस आलेल्या इमारती आणि डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करणे, आमदार निधीतून शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्र, कुस्ती आखाडा उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

मदतीचा ओघ सुरु

यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी दिलले्या माहितीनुसार, जोरदार अतिवृष्टीमुळे कोकणाला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे कोकणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सततच्या पावासामुळे दरड कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारसहित विविध स्थानिक स्वराज्य संस्थाकडूनही मदतीचा ओघ सुरु आहे.

सर्वांनीच पूरग्रस्तांना मदत म्हणून हातभार लावा

नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जात असताना अशा संकटातून त्यांना सावरणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. महापालिकेमार्फत 1 कोटी रुपयांचा निधी तसेच अन्न-धान्य, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या संकटातून बाहेर येण्यास त्यांना मदत होईल. तसेच पूरग्रस्त कोकणवासियांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. मी माझे 1 महिन्याचे वेतनही पूरग्रस्तांना देणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पूरग्रस्तांना मदत म्हणून हातभार लावावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.

(Give Rs 1 crore to the flood victims through the municipal corporation demand from MLA Manda Mhatre)

संबंधित बातम्या : 

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका धावली, 43 जणांचे वैद्यकीय पथक रवाना

महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात, घनकरचा व्यवस्थापनासह ‘या’ विभागांकडून तातडीची मदत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI