ग्रोमा असोसिएशन-निलेश वीरा फाऊंडेशन तर्फे एपीएमसी मार्केटमध्ये भव्य आरोग्य शिबीर, मंदा म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई एपीएमसी मार्केटमधील धान्य मार्केटमध्ये ग्रोमा असोसिएशन आणि निलेश वीरा फाऊंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन आमदार मंदा म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. तर धान्य मार्केट परिसरात सीसीटीव्हीसाठी 50 लाख रुपये निधी म्हात्रे यांनी जाहीर केला आहे.

ग्रोमा असोसिएशन-निलेश वीरा फाऊंडेशन तर्फे एपीएमसी मार्केटमध्ये भव्य आरोग्य शिबीर, मंदा म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन
Groma association

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केटमधील धान्य मार्केटमध्ये ग्रोमा असोसिएशन आणि निलेश वीरा फाऊंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन आमदार मंदा म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले. तर धान्य मार्केट परिसरात सीसीटीव्हीसाठी 50 लाख रुपये निधी म्हात्रे यांनी जाहीर केला आहे.

यावेळी सदर उपक्रमाचे कौतुक करत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले. तर टाटा रुग्णालयाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी ग्रोमा सदस्य आणि संचालक निलेश वीरा यांचे कौतुक केले. बाजार समितीच्या आवारातील संपूर्ण बँकांच्या माध्यमातून बाजार घटकांसह या स्वरूपाच्या उपक्रमात भाग घेऊ असे ही त्या म्हणाल्या.

शिबिराला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद नागरिक देत असून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. शिबीर 23 आणि 24 सप्टेंबर असे दोन दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. शिबिरात कर्करुग्णांकरिता रक्तदान करुन 500 बाटल्या रक्त संकलन करण्याचा मानस ग्रोमाने ठेवला आहे. तर उस्फूर्तपणे सहभाग घेणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू देखील देण्यात येत आहे.

तसेच इतर नागरिकांसाठी 70 प्रकारच्या आरोग्य तपासण्या केवळ 11 मिनटात केल्या जात आहेत. टाटा मेमोरियल रुग्णालय आणि फ्युजन हेल्थ केअर सोल्युशन यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न होत आहे. या उदघाटन प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, आमदार शशिकांत शिंदे, बाजार समिती प्रभारी सचिव संदीप देशमुख धान्य मार्केट संचालक निलेश वीरा, ग्रोमा सचिव भीमजी भानुशाली, माजी नगरसेवक राजू शिंदे आदी ग्रोमाचे पदाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना; नागरिकांची फवारणीची मागणी

नवी मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बारवर कारवाई, दीड लाखांचा दंड वसूल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI