डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना; नागरिकांची फवारणीची मागणी

डेंग्युचा प्रसार रोखण्यासाठी मादी आढळल्यानंतर संबंधित घरासह त्या परिसरातील 100 घरांचे सर्वेक्षण करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते, ती अधिक प्रभावीपणे राबविण्यास तत्परतेने सुरुवात करावी.

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना; नागरिकांची फवारणीची मागणी
डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना

नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत असली डेंग्यूने डोके वर काढले आहे. नवी मुंबईत सध्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील डेंग्युच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेत डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, डेंग्युचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी समनव्य राखून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. (Navi Mumbai Municipal Corporation’s effective measures for dengue control; Citizens demand spraying)

जेथे रुग्णसंख्या अधिक असेल तेथे डास उत्पत्ती शोध मोहिम राबविणार

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ज्याप्रमाणे हॉटस्पॉट निश्चित करुन लक्ष केंद्रीत केले जाते, त्याचप्रमाणे डेंग्युचा संशयित रुग्ण आढळल्यास त्या भागाकडे लक्ष केंद्रीत करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करावी. ज्या भागात जास्त केसेस त्याठिकाणी डास उत्पत्ती शोध मोहिम तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. डेंग्युचा प्रसार रोखण्यासाठी मादी आढळल्यानंतर संबंधित घरासह त्या परिसरातील 100 घरांचे सर्वेक्षण करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते, ती अधिक प्रभावीपणे राबविण्यास तत्परतेने सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.

सदर ठिकाणी अधिक बारकाईने डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करण्याची कार्यवाही करावी. तसेच डासनाशक फवारणी करण्याची कार्यवाही देखील अधिक प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तर परिसरात वाढत्या डेंग्यू आणि हिवताप रुग्णांमुळे डासनाशक फवारणी करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी नेरुळ विभाग अधिकारी यांच्याकडे केली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation’s effective measures for dengue control; Citizens demand spraying)

इतर बातम्या

नवरा लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही, सासरच्यांचा सूनेला मूल होण्यासाठी कोंबडीचं रक्त पाजून अघोरी प्रयोग, सासऱ्याकडून विनयभंग

‘तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त’, आशिष शेलारांचा घणाघात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI