Navi Mumbai Theft : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी केली अटक

गुन्हेगारांचा कसून शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस करत आहेत. याच दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी आलेखावरील आरोपी मोहम्मद मोईनुल अब्दुल मलिक यास 24 एप्रिल रोजी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने 9 घरफोडीचे गुन्हे कबूल केले.

Navi Mumbai Theft : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी केली अटक
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी केली अटक
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 02, 2022 | 3:31 PM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : कोपरखैराणेत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारा (Criminal)ला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद मोईनुल अब्दुल मलिक असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने 9 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोपरखैरणेमसह नवी मुंबईत घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. (Koparkhairane police arrested the burglar on record, Accused reveals 9 offenses)

मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गुन्हेगाराला अटक

गुन्हेगारांचा कसून शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस करत आहेत. याच दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी आलेखावरील आरोपी मोहम्मद मोईनुल अब्दुल मलिक यास 24 एप्रिल रोजी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने 9 घरफोडीचे गुन्हे कबूल केले. घरफोडी केलेला 10 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमालही आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने 2018 साली देखील 4 गुन्हे केले होते. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यादरम्यान त्याने हे गुन्हे केले. न्यायालयाने आरोपीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. (Koparkhairane police arrested the burglar on record, Accused reveals 9 offenses)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें