‘कुठेच रेमडेसिवीर नाही, टाहो कुणाकडे फोडायचा, सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं’

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे (Gajanan Kale slams Maharashtra Government over shortage of Remdesivir Injection).

'कुठेच रेमडेसिवीर नाही, टाहो कुणाकडे फोडायचा, सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं'
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन गजानन काळे यांच्याकडून मनस्ताप व्यक्त
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:02 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून हा तुटवडा लवकरच भरुन निघेल, असं आश्वासन वारंवार दिलं जात आहे. मात्र, ग्राउंड लेव्हलवरील परिस्थितीत प्रचंड भयानक आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अजूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीय. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण होत आहे. याच मुद्द्यावरुन मनसेचे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरवर राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यावर निशाणा साधला आहे (Gajanan Kale slams Maharashtra Government over shortage of Remdesivir Injection).

गजानन काळे नेमकं काय म्हणाले?

“आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकाही खाजगी रुग्णालयला ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून एकही रेमडेसिवीर देण्यात आले नाही. म्हणजेच ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या मनपातील खाजगी रुग्णालयांनाही एकही रेमडेसिवीर आज मिळाले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याबाबतच्या फक्त घोषणा करण्यात आल्या”, असा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.

“काळ्या बाजारात उपलब्ध नाही आणि शासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन पुरवत नाहीत. आता रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा तेही एकदा सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावे”, अशा शब्दात गजानन काळे यांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.

राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेडचा तुटवडा

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज 50 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये फुल आहेत. रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. याशिवाय रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक मेडिकल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या तासंतास रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे (Gajanan Kale slams Maharashtra Government over shortage of Remdesivir Injection).

हेही वाचा : VIDEO | ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ महिला अधिकाऱ्याचा प्रश्न, पुण्यात मनसे नगरसेवकाने झापलं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.