रुग्णालयात गैरहजर अधिकाऱ्यांना थेट नोटिसा, नवी मुंबई पालिका आयुक्त ‘अ‍ॅक्शन मोड’वर

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली. ( NMC Commissioner Surprise Visit to Hospital)

रुग्णालयात गैरहजर अधिकाऱ्यांना थेट नोटिसा, नवी मुंबई पालिका आयुक्त 'अ‍ॅक्शन मोड'वर

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली. यावेळी पालिका सेवेत ऑनकॉलवर असलेले आठ अधिकारी गैरहजर असल्याची बाब समोर आली. यानंतर पालिका आयुक्तांनी त्यांना नोटिसा बजावत चौकशीचे आदेश दिले आहेत. (Navi Mumbai Municipal Commissioner Abhijeet Bangar Surprise Visit To Vashi Hospital)

नवी मुंबईत नुकतंच कोरोनासाठी असलेले हे रुग्णालय सार्वजनिक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत बांगर यांनी आरोग्य सेवेची पाहणी करण्यासाठी या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी हजेरीपत्रक तपासत असताना ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.

तसेच हे अधिकारी यापूर्वीही अनेकदा गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अत्यावश्यक सेवेत रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना ऑनकॉल असताना सेवाकाळात उपस्थित असणे बंधनकारक असते. मात्र काही अधिकारी या नियम धुडकावून लावत आहे.

दरम्यान नवी मुंबईत पूर्वीच्या तुलनेत रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे रुग्णालय परत इतर रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे. तसेच याबाबतची सर्व सूचनाही नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात शस्त्रक्रियेची संख्या वाढविण्याबाबतही सांगण्यात आले. तसेच शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. (Navi Mumbai Municipal Commissioner Abhijeet Bangar Surprise Visit To Vashi Hospital)

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI