कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांची खुर्ची पळवली

दुपारी तीन तास प्रतिक्षा करून देखील उपायुक्तांनी भेट दिली नाही आणि बैठकीत असल्याचा निरोप दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट दालनातून उपायुक्तांची खुर्ची पळवून नेत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट उपायुक्तांची खुर्ची पळवली
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 9:42 PM

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगारांना तीन महिन्यापासून समान काम समान वेतन बाबत निर्णय घेण्यास दिरंगाई केली जात आहे. या निर्णयाची माहिती घेण्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मनपा दालनात प्रशासन उपायुक्तांना भेटण्यासाठी गेले. मात्र तीन तास बैठकीत असल्याचे साचेबद्ध उत्तर मिळत असल्याने अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांची खुर्ची पळवून नेत जोरदार घोषणाबाजी केली. (NCP workers directly snatched the chair of the Deputy Commissioner of navi mumbai municipal corporation)

नवी मुंबई महापालिका अस्तित्वात येवून पंचवीस वर्ष झाली. या काळात कर्मचाऱ्यांना आकृतीबंध मंजुरी नसल्याने पदोन्नती वेतन सुविधा यापासून वंचित राहावे लागत आहे. घनकचरा आरोग्य विभागातील साडेचार हजार कामगार समान काम समान वेतन सुविधेपासून वंचित आहेत. याबाबत प्रस्ताव सादर केला जाईल असे आश्वासन मनपा प्रशासन उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार गत तीन महिन्यांपासून देत आहेत. अतिरिक्त आयुक्त उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव रखडत असल्याचे कारण पुढे करून हा प्रस्ताव रखडवला जात होता. याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज मनपा मुख्यालयात धडकले.

दुपारी तीन तास प्रतिक्षा करून देखील उपायुक्तांनी भेट दिली नाही आणि बैठकीत असल्याचा निरोप दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट दालनातून उपायुक्तांची खुर्ची पळवून नेत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज प्रस्तावाला मंजुरी दिली असेल या अपेक्षेने अभिनंदन करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

आमदार गणेश नाईकांनीही पालिका आयुक्तांना धरले धारेवर

भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज मनपा आयुक्तांची भेट घेत नवी मुंबईत सुरू असलेल्या कारभारावरून आयुक्तांना चांगलेच धारेवर धरलंय. सध्या राज्याचा कारभार घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकाप्रमाणे सुरू आहे. पेशव्यांनी पात्रता नसलेल्यांना अधिकार सोपवल्याने त्यांनी ज्याप्रकारे जनतेची लूट करत जुलूम केले तशी परिस्थिती राज्य, जिल्हा आणि नवी मुंबई स्तरावर सुरू असल्याचे वक्तव्य करत आमदार गणेश नाईकांनी महाविकास आघाडीसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय. मनपात आयुक्तांना न मानणारे अधिकारी असून आपला बॉस दुसराच असल्याचे सांगतात असा गंभीर आरोप देखील नाईकांनी केलाय. राज्यात चालत असेल पण नवी मुंबईत बाराभाई कारभार चालू देणार नाही, असे ठणकावत याविरोधात लढण्यासाठी आम्ही तत्वर आणि तत्पर असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय. (NCP workers directly snatched the chair of the Deputy Commissioner of navi mumbai municipal corporation)

इतर बातम्या

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार एकाच मंचावर, भाषणात जुन्या आठवणींना उजाळा

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.