दरमहा 42 रुपये जमा करा आणि मिळवा 1000 रुपये मासिक पेन्शन, आता सरकारच्या या योजनेत मोठ्या बदलांची तयारी

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवतात. ही बचत पूर्णपणे ऐच्छिक आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. त्याचे मुख्य लक्ष्य असंघटित क्षेत्र आहे.

दरमहा 42 रुपये जमा करा आणि मिळवा 1000 रुपये मासिक पेन्शन, आता सरकारच्या या योजनेत मोठ्या बदलांची तयारी
दरमहा 42 रुपये जमा करा आणि मिळवा 1000 रुपये मासिक पेन्शन

नवी दिल्ली : अटल पेन्शन योजना ही सरकारद्वारे चालवलेली पेन्शन योजना आहे. या योजनेमध्ये अर्जदाराने सेवानिवृत्ती निधीसाठी पैसे जमा करु शकतो. जेव्हा अर्जदार वयाची 60 वर्षे पूर्ण करतो, तेव्हा त्याला हमी परताव्याचा लाभ दिला जातो. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालवली जाते. ही योजना देशातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे, जे 18-40 वयोगटातील आहेत. असंघटित क्षेत्रातील लोकांमध्ये ही योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी, अकाली बाहेर पडण्याचे नियम बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (Deposit Rs 42 per month and get a monthly pension of Rs 1000)

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवतात. ही बचत पूर्णपणे ऐच्छिक आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. त्याचे मुख्य लक्ष्य असंघटित क्षेत्र आहे. बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेले 18 ते 40 वर्षे वयाचे कोणतेही नागरिक या योजनेत सामील होऊ शकतात. या सरकारी-हमी योजनेअंतर्गत, ठेवीदाराला त्याच्या वयाच्या 60 व्या वर्षापासून जमा केलेल्या रकमेनुसार 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. वेळेआधी या योजनेतून बाहेर पडण्याचा एक खास नियम आहे. या योजनेत दरमहा 42 ते 210 रुपये जमा करावे लागतात.

– ठेवीदाराला ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या शाखेत जावे लागते.
– योजना बंद करण्यासाठी ठेवीदाराने बंद फॉर्म भरून तो बँकेत जमा करावा लागतो.
– फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराला सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते.
– जेव्हा बँक बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करते, तेव्हा योजनेत जमा केलेले पैसे परत केले जातात.
– योजनेअंतर्गत बँकेत जमा केलेली मुद्दल आणि त्यावर जोडलेले व्याज अर्जदाराच्या खात्यात हस्तांतरित केले जाते.
– बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर अर्जदाराच्या फोनवर एक मेसेज येतो.

जेव्हा अर्जदार 60 वर्षांचा असेल

अर्जदार 60 वर्षांचा झाल्यावर त्याला बँकेला विनंती पत्र द्यावे लागते. यामध्ये त्याला जास्त दराने मासिक पेन्शन हवी आहे की गॅरेंटेड किमान मासिक पेन्शन हवी आहे हे नमूद करावे लागेल. योजनेचा परतावा हमी परताव्यापेक्षा जास्त असेल तरच उच्च दराने मासिक पेन्शन उपलब्ध होईल. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला ठेवीदाराला पूर्वीप्रमाणेच मासिक पेन्शन मिळेल. कुटुंबातील इतर नामनिर्देशित व्यक्तीला केवळ तेव्हाच पेन्शन मिळेल जेव्हा ठेवीदार आणि त्याची पत्नी (जर ठेवीदार महिला असेल तर तिचा पती नामनिर्देशित असेल) दोघांचाही मृत्यू झाला असेल.

मुदतीपूर्वी बाहेर पडण्याचा नियम

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ठेवीदाराला त्याच्या इच्छेनुसार अकाली अकाउंट बंद करण्याची सुविधा मिळते. हा नियम लागू होतो जेव्हा सरकारच्या वतीने योजनेच्या ग्राहक किंवा अंशधारकाकडे पैसे जमा केले जातात. योजना घेताना ग्राहकाला बाहेर पडण्याची माहिती द्यावी लागते. बाहेर पडताना ग्राहकाला जमा केलेले पैसे मिळतात. मात्र, देखभाल शुल्क वजा केले जाते. ठेवीवर मिळवलेल्या निव्वळ वास्तविक उत्पन्नासह सरकारने केलेले योगदान परत केले जात नाही.

किती पैसे जमा करु शकता

अटल पेन्शन योजनेत, 30 वर्षांच्या व्यक्तीला 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी 116 रुपये जमा करावे लागतील. एखाद्याला फक्त वयाच्या 40 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. ज्या वयापासून या योजनेत सामील होतो, त्या वयापासून 40 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला पैसे जमा करावे लागतात. जर ठेवीदाराचे वय 18 वर्षे असेल, तर जर त्याने 40 वर्षे प्रत्येक महिन्याला 42 रुपये जमा केले तर त्याला 1000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. जर त्याने 84 रुपये जमा केले तर त्याला 2,000 रुपये पेन्शन मिळेल. त्याचप्रमाणे, जर त्याने 126 रुपये जमा केले तर त्याला 3,000 रुपये पेन्शन मिळेल, जर त्याने 168 रुपये जमा केले तर त्याला 4,000 रुपये पेन्शन मिळेल आणि जर त्याने दरमहा 210 रुपये जमा केले तर त्याला 5,000 रुपये पेन्शन मिळेल. (Deposit Rs 42 per month and get a monthly pension of Rs 1000)

इतर बातम्या

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या एका क्लिकवर

अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानचं फक्त 6 देशांनाच निमंत्रण का? भारताला का नाही? वाचा सविस्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI