पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदया फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

जगप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल (Padma Shri Anuradha Paudwal) यांच्या सुर्योदया फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट स्वरुपात देण्यात आल्या. पालिकेच्या आरोग्य विभागाला ऑक्सिजन मशीन सुपूर्द करून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदया फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट
Panvel Anuradha Poudwal
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:18 AM

नवी मुंबई : जगप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल (Padma Shri Anuradha Paudwal) यांच्या सुर्योदया फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट स्वरुपात देण्यात आल्या. पालिकेच्या आरोग्य विभागाला ऑक्सिजन मशीन सुपूर्द करून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे (Padma Shri Anuradha Paudwal’s Suryodaya Foundation Gave Oxygen Concentrators To Panvel Municipal Corporation).

यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सुर्योदया फाउंडेशनचे सेक्रेटरी विवेक मातोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम जाधव, श्रीकांत म्हात्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत शासनाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत 1985 पासून सुर्योदया फाउंडेशन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला. त्यामुळे ऑक्सिजन अभावी असंख्य रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन सर्वोदया फाउंडेशनच्या सर्वेसर्वा तथा जगप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वैद्यकीय उपकरणे भेट स्वरूपात दिली जात आहेत. पनवेल महापालिकेला 5 लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

तसेच ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्याठिकाणी सुर्योदया फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास सुर्योदया फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला.

अनुराधा पौडवाल यांनी स्वतः पनवेल महापालिकेत येऊन सुर्योदया फाउंडेशनच्या माध्यमातून दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर दिल्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Padma Shri Anuradha Paudwal’s Suryodaya Foundation Gave Oxygen Concentrators To Panvel Municipal Corporation

संबंधित बातम्या :

नियमांचं उल्लंघन करुन सराफ दुकान राजरोसपणे सुरु, खारघर वॉर्ड ऑफिसरकडून थेट दुकान सील

अरे व्वा…! नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 3 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.