गणेशोत्सवात खाजगी वाहनांनी जादा भाडे आकारल्यास पनवेल आरटीओ करणार कारवाई

गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्ताने पनवेल आणि नवी मुंबई येथील काही खाजगी, तसेच कंत्राटी बसचालक प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करीत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. जर कोणी असे जास्तीचे पैसे वसूल केले तर त्यांच्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करता येणार आहे.

गणेशोत्सवात खाजगी वाहनांनी जादा भाडे आकारल्यास पनवेल आरटीओ करणार कारवाई
गणेशोत्सवात खाजगी वाहनांनी जादा भाडे आकारल्यास पनवेल आरटीओ करणार कारवाई
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 7:11 PM

पनवेल : गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातही मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्या गावी गणपतीसाठी जात असतात. नवी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र अशात प्रवाशांना जादा भाडे जादा दर आकारुन खाजगी वाहन लुबाडणूक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Panvel RTO will take action if private vehicles charge extra fare during Ganeshotsav)

गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्ताने पनवेल आणि नवी मुंबई येथील काही खाजगी, तसेच कंत्राटी बसचालक प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करीत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. जर कोणी असे जास्तीचे पैसे वसूल केले तर त्यांच्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करता येणार आहे. त्यानुसार अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पनवेल आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

संबंधितांवर कारवाईचे आदेश

गौरी-गणपतीप्रमाणे इतर सण आणि उत्सवात मूळ गावी जाण्यासाठी भक्तांची खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून लूट करण्यात येते. आता याला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन विभागाने याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व आरटीओंना दिले आहेत. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारणीच्या तक्रारी येत असतात. यासाठी mvdcomplaint.enfs2@gmail.com तसेच mh46@maharashtranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशभक्तांना कमी गर्दीचा आणि पर्यायी मार्ग कळण्यासाठी बॅनर लावले

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पुणे मार्गे कमी गर्दीचा रस्ता उपलब्ध आहे. रस्त्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गणेशभक्तांना कमी गर्दीचा आणि पर्यायी मार्ग कुठला आहे हे कळावे यासाठी वाशीपासून ते कळंबोली, कळंबोली ते पळस्पे फाटापर्यंत बॅनर लावले आहे. रस्त्यात कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अतिरिक्त आरटीओ कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहे. खाजगी वाहनांना जादा दर आकारत असतील तर थेट आम्हाला तक्रार करा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (Panvel RTO will take action if private vehicles charge extra fare during Ganeshotsav)

इतर बातम्या

MPSC Result : राज्य सेवा परीक्षा 2019 निकालासंदर्भात महत्वाची अपडेट,एमपीएससीकडून परिपत्रक जारी

पुन्हा एकदा रंगणार भारत इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा थरार, वन-डेसह टी-20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.