AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरमध्ये वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, पालकांच्या आंदोलनानंतर शाळेची माघार

अखेर 8 तास पालकांच्या ठिक्या आंदोलनानंतर खारघरच्या विश्वजीत इंटरनॅशनल स्कुलने पालकांसमोर माघार घेतलीय.

खारघरमध्ये वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, पालकांच्या आंदोलनानंतर शाळेची माघार
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 9:35 PM
Share

नवी मुंबई : वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले पाठवणाऱ्या शाळेविरोधात खारघरमध्ये पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर 8 तास पालकांच्या ठिक्या आंदोलनानंतर खारघरच्या विश्वजीत इंटरनॅशनल स्कुलने पालकांसमोर माघार घेतलीय. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे दाखले मागे घेतलेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सकाळी 10 वाजल्यापासून खारघरच्या विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलसमोर आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेने राजकारण दूर ठेवत पालकांना पाठिंबा दिला. त्यामुळेच राजकीय दबावानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट मागे घेतले (Parents protest against School action for fee in Kharghar Navi Mumbai).

मागील 1 महिन्यापासून खारघरच्या या शाळेच्या वाढीव फी संदर्भात पालक आणि शाळा यामध्ये वाद सुरू होता. फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले दिले होते. यानंतर पालकांनी खारघरच्या विश्वज्योत शाळेत ठिय्या आंदोलन केलं. दाखले मागे घेण्यासाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे दाखले पाठवल्याविरोधात पालकांनी आंदोलन केलं. तसेच जोपर्यंत दाखले परत घेत नाही, तोपर्यंत शाळेतून हलणार नाही, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, दिवसभरात शाळेतील प्रशासन आणि पालक यांच्यात शाब्दिक चकमकही झालेली पाहायला मिळाली. या शाळेने 27 विद्यार्थ्यांना थेट मेलद्वारे शाळा सोडल्याचा दाखला पाठवला होता.

नेमकं काय घडलं?

लॉकडाऊन काळात शाळेमार्फत ऑनलाईन शिक्षण सुरु असताना वाढीव फी भरण्यास पालकांनी नकार दिला होता. युवासेनेच्या रुपेश पाटील यांनी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रारही केली. त्यांनतर वर्षा गायकवाड यांनी शाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही शाळेने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांचे दाखले पालकांना पाठवले. तसेच पालकांनी मागणी करुनही हे दाखले मागे घेतले नाही.

खारघरच्या विश्वज्योत शाळेनं शालेय शुल्क भरले नाही म्हणून 27 विद्यार्थ्यांचे दाखले हे मेलद्वारे दिले होते. त्यानंतर पालक आक्रमक झाले. शाळेच्या आवारामध्ये पालकांनी गर्दी केली. जोपर्यंत आम्हाला देण्यात आलेले दाखले शाळा प्रशासन परत घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला.

विभागीय शिक्षण उपसंचालकांचेकडून विश्व ज्योत शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात आलं होतं. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास मान्यता रद्द करु, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांमध्ये संघर्ष का होतोय? राज्य शासनाची भूमिका काय?

व्हिडीओ पाहा :

Parents protest against School action for fee in Kharghar Navi Mumbai

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.