नवी मुंबईत एका दिवसात 100 केंद्रांवर 34112 नागरिकांचे विक्रमी लसीकरण

मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध झाल्याने महानगरपालिकेची 4 रूग्णालये, 22 नागरी आरोग्य केंद्रे तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जम्बो सेंटरसह इतर विभागांतील शाळा, समाजमंदिरे अशा एकूण 100 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईत एका दिवसात 100 केंद्रांवर 34112 नागरिकांचे विक्रमी लसीकरण
नवी मुंबईत एका दिवसात 100 केंद्रांवर 34112 नागरिकांचे विक्रमी लसीकरण

नवी मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. याकरिता लसीकरण केंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. आज एकूण 100 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. या 100 लसीकरण केंद्रांवर एका दिवसात एकूण 34112 नागरिकांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले. (Record vaccination of 34112 citizens at 100 centers in one day in Navi Mumbai)

एकूण 100 लसीकरण केंद्रांवर लसीकरण

मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध झाल्याने महानगरपालिकेची 4 रूग्णालये, 22 नागरी आरोग्य केंद्रे तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जम्बो सेंटरसह इतर विभागांतील शाळा, समाजमंदिरे अशा एकूण 100 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी 18 ते 44 वयोगटातील 33 हजार 602 नागरिकांनी पहिला डोस तसेच 268 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षावरील 88 नागरिकांनी पहिला तसेच 103 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तसेच 60 वर्षावरील 22 नागरिकांनी पहिला व 29 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. अशा प्रकारे एकूण 33713 नागरिकांनी पहिला व 400 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. याशिवाय खाजगी रूग्णालयातील लसीकरण केंद्रांवरही 1019 नागरिकांनी पहिला व 2955 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेची 100 केंद्रे व खाजगी रूग्णालयातील केंद्रे मिळून 38086 इतके लसीकरण झाले.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऐरोलीत लहान मुलांसाठी आयसीयू वॉर्ड

ऐरोली येथील चिंचपाडा झोपडपट्टीत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरची क्षमता एकूण 100 बेडची असून त्यापैकी 17 बेडवर आयसीयू व व्हेंटीलेटरचे असणार आहेत. तसेच अन्य सर्वच बेडवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी विशेष आयसीयू वॉर्डही या रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ऐरोली आणि दिघा परिसरातील झोपडपट्टीवासीयांना आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धरतीवर वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. (Record vaccination of 34112 citizens at 100 centers in one day in Navi Mumbai)

इतर बातम्या

पाझर तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI