AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा; नारायण राणे यांची आतषबाजी

निवडणूक हे युद्ध आहे. यावेळी मोदींना मतं द्या, असा प्रचार करा. मोदी हेच आपला देश विकसित करतील. या मतदारसंघातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिसला पाहिजे, यासाठी कामाला लागा, असं आवाहन करतानाच आता वारंवार भेटत राहू. 4 जूनपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी स्वत: निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा; नारायण राणे यांची आतषबाजी
narayan raneImage Credit source: tv9 marathi
Updated on: Apr 03, 2024 | 7:16 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंधूने माघार घेतली आहे. मात्र, अजूनही या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. असं असूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अब की बार 400 पारचा नाराही दिला. तसेच ठाकरे पितापुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही केला. नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपने सिंधुदुर्गात एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना नारायण राणे यांनी हा दावा केला आहे. राज्यात किंवा देशात कुणीही विचारलं तर भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत, प्रामाणिक आहेत, मात्र त्यांना विनंती आहे की, हा विश्वास सार्थकी लागला पाहिजे. भांडू नका, नांदा सौख्य भरे, असं मार्गदर्शन नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.

तसे विरोधक येतात

गेल्या अडीच वर्षातील माझ्या कामाचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी कौतुक केलं. पण विनायक राऊत यांना त्याचं कौतुक नाही. ठाकरे गटाचे टवाळके संसदेत बसून राणे उत्तर देऊ शकले नाहीत, अशी बोंबाबोंब करत. गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात अविरत आहे. भात शेती सुरू झाली की जशी माकडं येतात, तसे विरोधक निवडणुकीच्या तोंडावर येतात. विनायक राऊत यांचे रोग सांगण्यासारखे नाहीत, अशी टीका राणे यांनी केली.

कोणता विकास केला दाखवा

1990 नंतर विरोधकांनी सिंधुदुर्गात कोणती विकासकामे केली ती दाखवा. चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत पुढे होते. आता उद्घाटनालाही पुढे होते. उद्धव ठाकरे इथे येऊन बोलतात, त्यांचं सगळं बाहेर काढणार, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हातवाऱ्यावरही त्यांनी टीका केली. अजून पैसा घेऊन या असे हातवारे उद्धव ठाकरे करायचे, असा दावा त्यांनी केला.

वैभव नाईक घमेलं

यावेळी त्यांनी वैभव नाईक यांचा घमेलं म्हणून उल्लेख केला. मी जिल्ह्यात आलोय. आता टीका करून दाखव. मी त्या सभेत व्यासपीठावर येतो. दाखवा टीका करून, असा इशाराच राणे यांनी दिला.

माझीही यंत्रणा

कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पिता पुत्र जेलमध्ये जाणार आहेत. ईडी, सीबीआयसारखी माझी वेगळी यंत्रणा असून त्याच्या माध्यमातून सगळी माहिती माझ्याकडे येते, असा दावा त्यांनी केला.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.