एकीकडे दु:ख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती

शिवसेनेकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येताना दिसतोय. भाजपकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी पक्षाने हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एकीकडे दु:ख, दुसरीकडे दिलासा, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, पण पत्नीला लॉटरी, सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 8:00 PM

शिवसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं. हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली. पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे ते सुद्ध चिंतेत होते. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना थोडासा दिलासादेखील दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली असली तरी त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याबाबतचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण या निर्णयाने भावना गवळी यांच्यासाठी मोठा राजकीय झटका बसणार आहे. भावना गवळी यांचं लोकसभेचं तिकीट कापलं जाईल अशी सातत्याने चर्चा होती. पण त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता शिवसेनेकडून राजश्री पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटाबाबत अखेर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे वाशिम-यवतमाळच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. वाशिम-यवतमाळसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

संजय राठोड काय म्हणाले?

“नामांकन दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्यावतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत. या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: हजर राहणार आहेत. उमेदवाराबाबत आमचे वरिष्ठ नेता स्वत: त्यावेळेस घोषणा करतील”, असं संजय राठोड म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राठोड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही उद्या नक्कीच शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार आहोत. आमच्या पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. “राज्याचे आमचे वरिष्ठ तीनही नेते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची इच्छा असेल तर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन निश्चितच केलं जाईल”, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.