AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधला, कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत; भाजप नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण

रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. ते कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत, असा दावा बन यांनी केला.

Rohit Pawar : रोहित पवारांनी निवडणुकीसाठी नवा मतदारसंघ शोधला, कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत; भाजप नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण
Rohit pawarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 12:27 PM
Share

पुण्यातील आमदार रोहित पवार यांच्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आंदोलनात पाहायला मिळत आहे. परंतु रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप नेते नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केला आहे. राजकीय आंदोलन म्हणत बन यांनी टीका केली. त्यानंतर यंदा रोहित पवार हे अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचा दावा केला आहे. बन यांच्या नव्या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

नवनाथ बन यांनी आरोप करताना म्हटलं की, ‘रोहित पवारांनी आंदोलन फ्लॉप होत असल्याचे लक्षात आल्यावर कालपासून बारामतीमधील लोकांना पुण्यात बोलावून घेतलं. त्यांच्या माध्यमातून गर्दी जमवली. रोहित पवार आता कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवणार नाहीत. तिथे पराभव होईल. त्यांचा पुण्यातील एका मतदारसंघावर डोळा असेल किंवा बारामती मतदारसंघावर डोळा असेल. त्यासाठी रोहित पवारांनी पुण्याला केंद्र बनवलं आहे. यात 20 टक्के विद्यार्थी आहेत. तर 80 टक्के कार्यकर्ते आहेत’.

‘चार दिवस कुणी फिरकलं नाही. काल दोन-तीन हजार लोकांची गर्दी जमवली. आज देखील गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. आज देखील आजूबाजूच्या पार्किंगचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की पुण्याच्या गाड्या आहेत किंवा बाहेरच्या गाड्या आहेत. अलिशान कारमधून येणारे विद्यार्थी आहेत का? या आंदोलनासाठी किती उधळपट्टी केली, रोहित पवारांनी सांगावी. तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहात. विद्यार्थ्यांच्या नावावर आंदोलन करत आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. जवळपास हजार गाड्यामधून लोक बोलावली आहेत. त्यांचं आंदोलन फ्लॉप झालं आहे.  त्यामुळे पैसे देऊन माणसं गोळा केली. तुमची नौटंकी उघड झाली आहे. MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. परंतु पेपरफुटी ही त्यांच्या काळात झाली नाही. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सचिवाची बदली झाली आहे.  तर रोहित पवारांच्या आंदोलकांचा एक गट देखील मुख्यमंत्र्यांना भेटला. त्यांनी आंदोलन करणार नसल्याचे सांगितले होते. परंतु रोहित पवारांनी त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडलं. आज राज ठाकरे, मनोज जरांगे जाणार असल्याचं कळतंय’.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल