राज्यात अनेक समस्या मात्र सरकारला केवळ मद्यविक्रीतच रस; वाईन पॉलिसीवरून नवनीत राणा यांचा टोला

सुरेंद्रकुमार आकोडे

सुरेंद्रकुमार आकोडे | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Jan 30, 2022 | 3:58 PM

राज्य सरकारकडून शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला (Wine sales) परवानगी देण्यात आली आहे. किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर (State Government) टीकेची झोड उठवली आहे. आता या वादात खासदार नवनीत राणा यांनी देखील उडी घेतली आहे.

राज्यात अनेक समस्या मात्र सरकारला केवळ मद्यविक्रीतच रस; वाईन पॉलिसीवरून नवनीत राणा यांचा टोला
नवनीत राणा

मुंबई : राज्य सरकारकडून शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला (Wine sales) परवानगी देण्यात आली आहे. किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर (State Government) टीकेची झोड उठवली आहे. वाईनवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. दरम्यान आता या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसून, त्यांना केवळ मद्यविक्रीत रस असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. राज्यात इतरही अनेक विषय आहेत समस्या आहेत मात्र तरी देखील सरकार किराणा दुकांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देत असल्याचा टोला यावेळी राणा यांनी लगावला आहे.

नेमंक काय म्हणाल्या राणा?

राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. मात्र त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. परंतु दुसरीकडे किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. यावरून सरकारला केवळ मद्य विक्रीत रस असल्याचे दिसून येते. या सर्वांमधून वेळ मिळालाच तर सरकारने राज्यातील इतर समस्यांकडे देखील लक्ष द्यावे असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे.

‘फडणवीस खुलासा करतील, याची राऊतांना भीती’’

दरम्यान दुसरीकडे भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील वाईन विक्रीवरून ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने वाईन विक्रीचे नवे धोरण आणले आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. मात्र परदेशातील व्यावसायिकांच्या हितासाठीची ही योजना आहे, व्यावसायिकांसोबत परदेशात कोणती बैठक झाली, याचा खुलासा देवेंद्र फडणवीस करू शकतात, अशी भीती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वाटतेय, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. ते म्हणाले, ‘जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावंच्या गावं अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.

 

संबंधित बातम्या

नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले…अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI