AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन विक्री, गांजा म्हणजे सेंद्रीय सिगारेट, वाचा धक्कादायक खुलासे आणि मलिक यांच्या जावयाच्या अडचणी

समीर खान यांना बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. तब्बल 10 तासांच्या सखोल चौकशीनंतर एनसीबीने त्यांना अटक केली आहे.

ऑनलाईन विक्री, गांजा म्हणजे सेंद्रीय सिगारेट, वाचा धक्कादायक खुलासे आणि मलिक यांच्या जावयाच्या अडचणी
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
| Edited By: | Updated on: Jan 13, 2021 | 11:19 PM
Share

मुंबई : मुंबईमध्ये 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे. समीर खान यांना बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. तब्बल 10 तासांच्या सखोल चौकशीनंतर एनसीबीने त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. (ncb mumbai arrested minister nawab malik son in law sameer khan in drugs case)

मुंबईचे एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यानंतर पुढच्या कारवाईमध्ये खार इथल्या करण सजनानी यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळीच तपासादरम्यान वांद्रे इथल्या रहिवासी समीर खानचं नाव समोर आलं. यानंतर त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं.

मंगळवारी या सगळ्या प्रकरणात एनसीबीने मुंबईचे मुच्छड पानवाला राम कुमार तिवारी यांना अटक केली. याआधी सोमवारी एनसीबीने मुच्छड पानवाला, जयशंकर तिवारी आणि रामकुमार तिवारी यांच्या मालकांची अनेक तास चौकशी केली. रामकुमार तिवारी हा जयशंकर तिवारीचा धाकटा भाऊ असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुच्छड पानवाला हा जामिनावर सुटला आहे. 15 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड पानवाला यांना जामीन मंजूर केला.

कोर्टात काय बोलले करण सजनानी ?

ज्याला गांजा समजलं जात आहे. ती एक सेंद्रिय सिगारेट असल्याचं करण सजनानी यांना कोर्टात म्हणटलं आहे. मी ते ऑनलाइन विकतो. हे सेंद्रीय सिगारेट आहे. ते गुलाबाच्या पाकळ्या आणि पानांपासून बनवलं जातं. ते गांज्यासारखं दिसतं पण ते गांजा नसल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कुरिअरमधून जप्त केलेला गांजा हा करण सजनानी यांनीच मुंबई वगळता इतर अनेक राज्यांतील ग्राहकांना पाठवला होता. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासावेळी बॉलिवूडमधलं ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक सिनेस्टार एनसीबीच्या भोवऱ्यात होते.

समीर खान यांचा करण सजनानीसोबत व्यवहार

ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

मुच्छड बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड पानवाला यांना मिळाला जामीन

मुंबईचा प्रसिद्ध करोडपती मुच्छड पानवाला हा जामिनावर सुटला आहे. 15 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड पानवाला यांना जामीन मंजूर केला. या आठवड्याच्या सुरुवातीच्या ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुधवारी मुंबईच्या विशेष कोर्टाने मुच्छड पानवाला यांना उर्फ ​​जयशंकर तिवारी याला अटक केली होती. सोमवारी जयशंकर यांची एनसीबीने बराच तास चौकशी केली व त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याला एनसीबीने मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. (ncb mumbai arrested minister nawab malik son in law sameer khan in drugs case)

संबंधित बातम्या – 

शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही; चंद्रकांतदादांचं मोठं विधान

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप, शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणतात…

(ncb mumbai arrested minister nawab malik son in law sameer khan in drugs case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.