AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar learjet 45 : अजित पवारांच्या निधनानंतर लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा

Ajit Pawar learjet 45 : अजित पवार यांच्या निधनानंतर लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा झाला आहे. अजित पवार याच विमानातून प्रवास करत होते. या विमानाला का आगीचा गोळा म्हटलं जातं? जाणून घ्या सर्वकाही. महाराष्ट्राने या विमान अपघातात आपला मोठा नेता गमावला आहे.

Ajit Pawar learjet 45 : अजित पवारांच्या निधनानंतर लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा
Ajit Pawar learjet 45
| Updated on: Jan 28, 2026 | 2:20 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. ते लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. लँडिंगच्यावेळी अचानक विमानात बिघाड झाला. त्यानंतर विमान क्रॅश झालं. अपघाताशी संबंधित माहितीमध्ये हे सुद्धा समोर आलय की, लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानांचे याआधीही अनेक अपघात झालेत. जगभरात या श्रेणीच्या विमानांचे जवळपास 200 अपघात झालेत. वर्ष 2023 मध्ये मुंबईतही लियरजेट-45 विमानाला अपघात झाला होता. पण त्यावेळी कोणाचा मृत्यू झाला नव्हता.

1960 साली बिझनेसमॅन विलियम पॉवेल लियर यांनी लियरजेट प्रकारच्या विमान निर्मितीची सुरुवात केली. हे विमान Bombardier Aerospace (कॅनडा) च्या अधीन आहे. या क्लासची विमानं नेते आणि बिझनेसमनच्या विशेष पसंतीची असतात. अपघाताची संख्या पाहून 2021 साली कंपनीने या प्लेनच प्रोडक्शन बंद केलं होतं. विमानांचा मेंटेनेंस आणि सर्विसच काम अजूनही सुरु आहे.

लियरजेट-45 विमानांचा स्पीड आणि रेंज किती?

लियरजेट-45 श्रेणीतील चार्टर्ड विमानं जगभरात प्रसिद्ध आहेत. यात 6 ते 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते. लियरजेट 45 मॉडलचा टॉप स्पीड 860 किलोमीटर प्रतितास आहे. क्रूज स्पीडही इतकाच आहे. या विमानाची उड्डाणाची रेंज 1,900 ते 2,200 नॉटिकल मील म्हणजे जवळपास 3,500 ते 4,000 किलोमीटर आहे.

किती हजार फूट उंचीवरुन उड्डाण करण्याची क्षमता?

जमिनीवरुन उंचावर जाईपर्यंत विमानाच स्पीड खूप जास्त असतो. हे चार्टर्ड विमान फक्त 18 ते 20 मिनिटात 41 हजार फूट उंचीवर पोहोचू शकतं. विमानात वायफाय आणि सॅटलाइट फोनची सुविधा असते. हे विमान छोट्या रनवेवर लँडिंग आणि टेक ऑफसाठी परफेक्ट मानलं जातं.

कुठलं इंजिन वापरतात?

या विमानात कॅनडाच्या Pratt & Whitney कंपनीने बनवलेलं ट्विन टर्बोफॅन इंजिन आहे. इंधनाच्या दृष्टीने हे विमान फायदेशीर मानलं जातं. विमानात डिजिटल फ्लाइट कंट्रोल, चांगल्या नेविगेशन सिस्टिममुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान चांगलं मानलं जातं.

कितीवेळा लँडिंगचा प्रयत्न?

अजित पवार मुंबईहून बारामतीला चाललेले. त्यांच्या पक्षाच्या आज तिथे चार सभा होत्या. रिपोर्टनुसार लँडिंग आधी बारामती एअरपोर्टजवळ हे प्लेन क्रॅश झालं. अजित पवार यांच्या विमानाने दोनवेळा लँडिंगचा प्रयत्न केला. पण बारामती एअरपोर्टवर विमानाला लँडिंग करता आलं नाही. या दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर.
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा.
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत.
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश.
अजित पवारांचा अपघाती मृत्यू; राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर
अजित पवारांचा अपघाती मृत्यू; राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ
अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ.
अजित पवारांचा अपघाती मृत्यू, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त
अजित पवारांचा अपघाती मृत्यू, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त.
दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या भावना
दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या भावना.
रोहित पवार आणि त्यांचे वडिल हॉस्पिटलमध्ये दाखल
रोहित पवार आणि त्यांचे वडिल हॉस्पिटलमध्ये दाखल.