नवी दिल्ली : देशाती राजधानी दिल्लीत (Delhi) आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय हेतून काम करतात, असा आरोप शरद पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.