Maharashtra Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक, नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 30, 2023 | 11:48 PM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक, नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

मुंबई: अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पडलं. पावसामुळे उत्तर भारतात पुन्हा कडाक्याच्या थंडीची लाट. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 30 Jan 2023 11:46 PM (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक

  पुणे :

  कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका ठरणार?

  राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक

  कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीची बैठक

  सर्व माजी नगरसेवक, सेल अध्यक्ष, प्रदेश, शहर व मतदारसंघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक

  राष्ट्रवादी काँग्रेस भवनात उद्या संध्याकाळी बैठक

 • 30 Jan 2023 08:07 PM (IST)

  केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या बाजूने निकाल देईल; अनिल देसाई यांना विश्वास

  मंबई

  लेखी उत्तरासाठी आजची तारीख दिली होती, त्यानुसार आज लेखी युक्तिवाद सादर केला

  20 जून 2022 पासून ज्या घडामोडी होत्या घडल्या त्या सगळ्याचा तपशील

  शेवटपर्यंत घडलेल्या घडामोडीचा तपशील या लेखी युक्तिवादामध्ये सादर केला

  सगळ्या सुनावणीचा इतिवृत्त निवडणूक आयोगाकडे सादर

  केंद्रीय निवडणूक आयोग युक्तिवाद बघतील ते त्यांच्या रेकॉर्डवर असतील

  हे सगळं पाहून केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या बाजूने निकाल देईल

  आमदार खासदार लोक प्रतिनिधी याला पक्ष नेतृत्व तिकीट पक्ष कडून दिलं जात

  पक्षाचे कार्यकर्ते जेंव्हा एखाद्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी झटत असतात

 • 30 Jan 2023 07:22 PM (IST)

  मनसेच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक

  पुणे :

  - कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भातील मनसेची भूमिका उद्या ठरणार?

  - पोटनिवडणूकीतील भूमिका ठरवण्यासाठी मनसेच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक,

  - मनसे शहर कार्यालयात संध्याकाळी 4:30 वाजता बैठकीचे आयोजन

  - कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मनसे तटस्थ राहण्याची शक्यता

 • 30 Jan 2023 06:40 PM (IST)

  स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम यांना गांधीनगर सत्र न्यायालयाने ठरवलं दोषी

  जवळपास 10 वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ठरवलं दोषी

  अहमदाबादच्या मोटेरा इथल्या आश्रमात असताना सुरतमधल्या एका महिलेनं केला होता बलात्काराचा आरोप

 • 30 Jan 2023 06:37 PM (IST)

  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग

  विजयवाडामधील गन्नावरम एअरपोर्टवर करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग

  टेक-ऑफनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा घेण्यात आला निर्णय

  दिल्लीला जात होते मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी

 • 30 Jan 2023 05:54 PM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी शाळेतील धक्कादायक प्रकार

  शाळेतील 9 आणि 10च्या मुलींना शिक्षकाने दाखविला पॉर्न व्हिडीओ

  अनेक विद्यार्थिनीनी सोबत संबंधित शिक्षकांने गेल्या दोन वर्षापासून करत होता गैरकृत्य

  विद्यार्थी आणि पालकातुन संताप व्यक्त

  इंग्रजी शिक्षक व्ही.पी बांगडी याचे गैरकृत्य

  संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली

  संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी - पीडित विद्यार्थीनीची मागणी

  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधित शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला

 • 30 Jan 2023 05:42 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक, 'सह्याद्री'वर खलबतं

  मुंबई : 

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प एक तारखेला मांडला जाणार आहे. त्या पार्शवभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राज्याचे केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विषयांची माहिती खासदारांना दिली जाणार आहे, जेणेकरून अर्थसंकल्प अधिवेशनात खासदारांना ते विषय मांडता येतील

  सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे हे नेते मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

 • 30 Jan 2023 05:02 PM (IST)

  शिंदे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल

  नवी दिल्ली : 

  शिंदे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल

  लेखी उत्तर मांडणार

  मुळ पक्ष आम्हीच आहोत आम्हाला पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं,

  एकनाथ शिंदे यांच मुख्य नेतेपद घटनात्मक आहे

  पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे बहुमत आमच्याकडे आहे

  चिन्ह देताना लोकप्रतिनिधी संख्याबळ विचारात घेतलं जावं

  निवडणूक आयोगानं सांगितल्याप्रमाणे आम्ही पुराव्यांची पुर्तता केली आहे

  आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं

 • 30 Jan 2023 04:43 PM (IST)

  पाकिस्तान : पेशावरच्या पोलीस लाइनजवळील मशिदीमध्ये ब्लास्ट

  नमाजनंतर मशिदीत झाला स्फोट

  ब्लास्टमध्ये 28 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

  ब्लास्टमध्ये मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळला

 • 30 Jan 2023 04:06 PM (IST)

  शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर

  नवी दिल्ली : 

  शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर

  ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे आपलं लेखी म्हणणं मांडण्यात आलंय

 • 30 Jan 2023 04:05 PM (IST)

  दोन्ही गटाला निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर करण्यासाठी एक तास शिल्लक

  नवी दिल्ली : 

  - दोन्ही गटाला निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर करण्यासाठी एक तास शिल्लक

  - निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे गटाला 5 पर्यंतची मुदत

 • 30 Jan 2023 03:05 PM (IST)

  कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू; सावकाराची कोल्हापुरातील महिलेला धमकी

  कोल्हापूर

  कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू, सावकाराची कोल्हापुरातील महिलेला धमकी

  कर्ज वसुलीसाठी गुंडांकडून महिलेला मारहाण

  25 लाखांच्या कर्जासाठी 80 लाखाची वसुली

  वसुलीसाठी गुंड पाठवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

 • 30 Jan 2023 03:00 PM (IST)

  Shweta Sehrawat: ऋषभ पंतच्या 'गुरुकुल'मध्ये पाहिलं स्वप्न, त्यानंतर एका पत्राने बदललं आयुष्य

  Shweta Sehrawat: लक्ष्मण यांचं 'ते' पत्र श्वेताच्या हातात पडलं नसतं, तर आज....वाचा सविस्तर.....

 • 30 Jan 2023 02:49 PM (IST)

  गोवंडीत प्रदुषित हवामानाला कंटाळले स्थानिक, आंदोलनाचं ऊपसलं हत्यार

  भाजपच्या माजी नगरसेवकाचं काँक्रीट प्लांटच्या विरोधात आंदोलन सुरू

  खाजगी रेडीमिक्स कांक्रीट प्लांटचा स्थानिकांच्या आरोग्याला फटका बसत असल्याचा आरोप

  आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्यामुळे प्लांटच्या प्रदूषणाने आरोग्य धोकादायक बनल्याने श्वसनाशी निगडीत समस्या ऊद्भवत असल्याचा स्थानिकांचा आरोप

 • 30 Jan 2023 02:19 PM (IST)

  पाकिस्तानात मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट

  पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट. 35 जण जखमी झाल्याची माहिती. पेशावरच्या मशिदीत बॉम्बस्फोट.

 • 30 Jan 2023 02:15 PM (IST)

  IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाने घेतला दोघांचा धसका, 'या' ठिकाणी सुरु केली स्पेशल प्रॅक्टिस

  IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाने टेस्ट सीरीज सुरु होण्याआधीच या दोघांचा धसका घेतला आहे. त्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच रणनितीवर काम सुरु केलय. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 02:14 PM (IST)

  IND vs NZ : 3rd T20 साठी टीम इंडियात दिसू शकतो मोठा बदल, टॉप प्लेयरला बसणार धक्का

  IND vs NZ : T20 सीरीजमध्ये टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध अडखळतेय. त्यामुळे बदल करण्याची गरज. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 02:13 PM (IST)

  Rishabh Pant Health : ऋषभ पंतबाबत एक मोठी Good News

  जे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आतुर होते, तीच बातमी आहे. वाचा सविस्तर...

 • 30 Jan 2023 01:56 PM (IST)

  कोल्हापूर

  कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू, सावकाराची कोल्हापुरातील महिलेला धमकी

  कर्ज वसुलीसाठी गुंडांकडून महिलेला मारहाण

  25 लाखांच्या कर्जासाठी 80 लाखाची वसुली

  वसुलीसाठी गुंड पाठवून दहशत वाजवण्याचा प्रयत्न

 • 30 Jan 2023 01:49 PM (IST)

  जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे यांना पोलिसांनी केली अटक

  पंढरपूर : एका महिलेचा विनयभंग व मारहाणीच्या आरोपाखाली पोलिसांनी केली सुळे यांना अटक,

  संतोष सुळे गेल्या पंधरा दिवसापासून होता फरार, अखेर पोलिसांना सुळे आला शरण

  राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची जवळीक साधलेला संतोष सुळे कायमच पंढरपुरात चर्चेत राहिले,

  स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे निकटवर्तीय समजले जातात संतोष सुळे,

  शेता शेजारील महिलेची बांधावरून भांडनात सुळे याला झाली अटक,

  संतोष सुळे च्या अटकेमुळे पंढरपूर राष्ट्रवादीत मोठी खळबळ.

 • 30 Jan 2023 01:14 PM (IST)

  चंद्रकांत खैरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर टीका

  औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी एमआयएमची मते शिवसेनेला मिळवून दिली,

  एकनाथ शिंदे यांचे एमआयएम सोबत पूर्वीपासून संबंध आहेत,

  काहीही बोलणाऱ्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मालिन होत आहे,

  देशातील हवा सध्या बदलत चालली आहे,

  महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांची हवा आहे.

 • 30 Jan 2023 12:08 PM (IST)

  केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन 2 टप्प्यात होणार

  पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी

  दुसरा टप्पा 13 मार्च ते 6 एप्रिल

  1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार

 • 30 Jan 2023 12:04 PM (IST)

  जालना समृद्धी महामार्गावर अपघात

  जालना : म्हशी घेऊन जाणारा ट्रक समृद्धी महामार्गावर उलटला,

  बदनापूर जवळ 40 म्हशी घेऊन जाणारा ट्रक उलटला,

  9 म्हशींचा जागीच मृत्यू, ट्रक औरंगाबाद कडे जात असल्याची माहिती,

  चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती.

 • 30 Jan 2023 11:26 AM (IST)

  VIDEO : World Cup Final मधील अर्चना देवीची कॅच पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, Wow, जबरदस्त

  या अशाच फिल्डिंगमुळे टीम इंडियाने काल वर्ल्ड कप जिंकला, एकदा हा VIDEO बघा. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 11:25 AM (IST)

  297 रन्स, 11 विकेट आणि वर्ल्ड चॅम्पियन, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाच्या 'या' 4 स्टार

  'त्या' चौघींमुळे टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 11:01 AM (IST)

  मुंबईत मेट्रोच्या कामांचा वाहन चालकांना फटका

  मुंबईत मेट्रोच्या कामांचा वाहन चालकांना फटका

  मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर ते चेंबूर ३ किलोमीटर ट्रॅफिक जाम

  मेट्रोच्या विविध कामांमुळे शेल काॅलनी लगत हायवेवर वाहतूकीचा वेग मंदावला...

  ट्राफिक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू

  रोज याच पॉईंटवर बॉटल ने तयार होत असल्याने वाहन चालकांना वाहतुकीच्या समस्येला द्यावा लागत आहे तोंड

 • 30 Jan 2023 10:51 AM (IST)

  पदवीधर मतदारसंघ निवडणूक: अमरावती विभागात पहिल्या दोन तासात सकाळी 10 वाजेपर्यंत 5.49% मतदान

  विभागनिहाय मतदान

  अमरावती-4.25% अकोला-5.63% बुलढाणा-6.38% वाशिम-7.42% यवतमाळ-5.78% एकूण मतदान-5.49%

 • 30 Jan 2023 10:44 AM (IST)

  अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतदानासाठी अकोल्यात पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतदानासाठी अकोल्यात पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

  दहा वाजता नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली..

  अकोला जिल्ह्यात 50 हजार 606 मतदार तर अमरावती विभागात 2 लाख 6 हजार 177 पदवीधर मतदार..

  भाजपचे डॉ रणजित पाटील विरुद्ध मविआचे धिरज लिंगाडे अशी लढत..

  23 उमेदवार आहेत निवडणूक रिंगणात...

 • 30 Jan 2023 10:33 AM (IST)

  पुणे विमानतळावर कर्मचारी अन् प्रवाशांमध्ये जोरदार राडा

  पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या गोफर्स्टच्या विमानास उशीर झाला. बोर्डिंग गेटवरील काउंटरवर एकही कर्मचारी नव्हता. यामुळे संध्याकाळी ७.४० वाजता विमानात चढण्याचे सांगण्यात आले...सविस्तर

 • 30 Jan 2023 10:31 AM (IST)

  बागेश्वर बाबांच्या विरोधात मनसे आक्रमक

  पुणे : संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम माऊलींबद्दल अकलेचे तारे तोडणाऱ्या भोंदू बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध !

  बागेश्वर बाबाने आपल्या वक्तव्याची ताबडतोब माफी मागितली पाहिजे,

  पुण्यातील मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांची मागणी.

 • 30 Jan 2023 10:23 AM (IST)

  आज सकाळच्या सत्रात भारतीय बाजारात घसरण

  बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरणीने सुरुवात

  निफ्टी 17,500 अंकापेक्षा कमी तर सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

  सुरुवातीच्या सत्रात 885 शेअरमध्ये तेजी

  तर 1306 शेअरमध्ये घसरण, 190 शेअरमध्ये बदल नाही

 • 30 Jan 2023 10:09 AM (IST)

  कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक, महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  'शिक्षकांचा आमदार शिक्षकच होणार!'

  ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मतदानानंतर विश्वास

  'माझा विजय हीच मोते सरांना खरी श्रद्धांजली ठरेल!'

  म्हात्रे यांनी काढली रामनाथ मोते यांची आठवण

 • 30 Jan 2023 10:04 AM (IST)

  वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेफाली वर्मा इमोशनल, नाही रोखता आले अश्रू

  Indian Cricket Team: भारताच्या महिला टीमने इंग्लंडला 7 विकेटने हरवून अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावल आहे. मॅचनंतर कॅप्टन शेफाली वर्मा इमोशनल झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. वाचा सविस्तर...

 • 30 Jan 2023 10:03 AM (IST)

  U-19 WC Final : वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय महिला टीमचा जबरदस्त डान्स पाहिलात का? VIDEO

  U-19 WC Final : विजयानंतर सेलिब्रेशनही तितकच जोरदार. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 09:46 AM (IST)

  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर पसरलीये

  सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर पसरली आहे

  इंदापूर ते पाटसपर्यंत साधारण 70 किलोमीटर्स धुक्याचे चादर पाहायला मिळतेय

  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने महामार्ग धुक्यात हरवला आहे

  राष्ट्रीय महामार्गावर धुकं पसरल्यानं अपघात होण्याची दाट शक्यता आहे

  त्यामुळे हायवे पोलिसांकडून वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे

 • 30 Jan 2023 09:00 AM (IST)

  अमरावती पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील आणि त्यांच्या डॉ अपर्णा पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार

  अकोला शहरातील आर डी जी कॉलेजमध्ये केले दोघांनीही मतदान

  या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजय होण्याचा व्यक्त केला विश्वास

 • 30 Jan 2023 08:58 AM (IST)

  सोलापूरमध्ये रेडिमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग

  भीषण आगीमध्ये रेडिमेड गारमेंट्सचे 2 कारखाने जळून खाक

  दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी मंदिराशेजारील कारखान्यांना लागली आग

  नागरी वस्तीत ही आग लागल्याने अग्निशमन दल सतर्क

  आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

  गड्डम आणि कुरापाटी हे दोन रेडिमेड गारमेंट्स कारखाने आगीच्या भक्षस्थानी

  सोलापूर अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल

  सुरुवातीला एका कारखान्याला आग लागल्यानंतर ती आग दुसऱ्या कारखान्यापर्यंत गेली

 • 30 Jan 2023 08:57 AM (IST)

  भाजप उमेदवार व आमदार रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

  आचारसहिता भंग केल्याने अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  काल अमरावतीच्या महेश भवनमध्ये मेळावा आयोजित केल्याने गुन्हे दाखल

  आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने केला होता मेळावा आयोजित

 • 30 Jan 2023 08:47 AM (IST)

  भंडारा जिल्ह्यात 12 मतदान केंद्रावर 3997 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार

  सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात.

  जुनी पेन्शन या विषयाला घेऊन शिक्षक मतदार कोणाला कौल देतात हे महत्वाचे असणार आहे

 • 30 Jan 2023 08:41 AM (IST)

  आज पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर

  कच्चा तेलात पडझड कायम

  मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये, डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

  अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

  अकोल्यात पेट्रोल 106.37 रुपये आणि डिझेल 92.91 रुपये प्रति लिटर

  अमरावतीत 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

  औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

  नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

  नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.96 रुपये प्रति लिटर

  जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर

  नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर

  लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर

  कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर

  सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

 • 30 Jan 2023 08:28 AM (IST)

  U-19 WC Final : कंजूस गोलंदाजीने भारताला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे तितास साधु?

  U-19 WC Final : तितास साधुच्या बॉलिंगमुळे फायनलमध्ये इंग्लंडची टीम बॅकफूटवर गेली. पहिल्याच ओव्हरमध्ये तिने टीम इंडियाला सुरुवातच तशी करुन दिली. 1.50 तिच्या गोलंदाजीची इकॉनमी होती. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 08:27 AM (IST)

  IND vs NZ 2nd T20 : 100 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 'दम' निघाला, रडतखडत विजय

  IND vs NZ 2nd T20 : T20 सीरीजमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवण आवश्यक होतं. 100 धावांचा पाठलाग करताना अशी स्थिती होईल याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. वाचा सविस्तर....

 • 30 Jan 2023 08:27 AM (IST)

  T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने रचला इतिहास, इंग्लंडचा दारुण पराभव

  महिला क्रिकेटमध्ये सीनियर स्तरावर तीनवेळा भारताला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी भारताच्या युवा महिला टीमने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला. वाचा सविस्तर...

 • 30 Jan 2023 08:20 AM (IST)

  नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

  नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

  मात्र शहरात आज पडलेल्या दाट धुक्या मुळे मतदानावर होणार परिणाम

  वातावरणात गारवा असल्याने मतदार अद्याप घराबाहेर पडले नाही

  सकाळीच्या सुमारास मतदारांचा अल्प प्रतिसाद

  वातावरण बदलाचा मतदानाला बसणार फटका ?

 • 30 Jan 2023 08:15 AM (IST)

  घनदाट झाडीत वाट चुकलेल्या एक 70 वर्षीय आजोबाना शिवदुर्ग टीम सुरक्षित आणले शोधून

  -लोणावळ्यातील कैवल्यधाम जवळच्या डोंगरावरील घनदाट झाडीत वाट चुकलेल्या एक 70 वर्षीय आजोबाना शिवदुर्ग टीम सुरक्षित आणले शोधून

  -राजेंद्र काळे अस 70 वर्षीय आजोबांचं नाव

  -राजेंद्र कांबळे आणि त्याच्या सोबत अन्य दोन परदेशी व्यक्ती डोंगरावर फिरायला गेले होते त्यापैकी ते दोन परदेशी व्यक्ती परत आले मात्र राजेंद्र काळे हे आजोबा आले नाही ही बाब लक्षात येताच

  -लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग टीमला पाचारण करत मदत मागितली तात्काळ शोध मोहीम सुरू केली

  -त्यावेळी राजेंद्र काळे आजोबा मोठ्या शोध कार्यानंतर घनदाट जंगलातील एका गुहे जवळ आढळून आले

 • 30 Jan 2023 08:13 AM (IST)

  मराठवाडा शिक्षक मतदार संघ मतदान प्रक्रियेला सुरुवात

  मराठवाडा शिक्षक मतदार संघ मतदान प्रक्रियेला सुरुवात

  सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू

  14 उमेदवारांचे भवितव्य आज होणार मतपेटीत बंद

  मराठवाड्यात 227 मतदान केंद्रावर होत आहे मतदान

  औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 53 केंद्रावर होणार शिक्षक मतदार संघासाठी मतदान

  शिक्षक मतदार संघासाठी मराठवाड्यात 61 हजार 529 मतदार

  औरंगाबाद जिल्ह्यात 13924 मतदार

  लातूर जिल्ह्यात 11264 मतदार

  2 फेब्रुवारीला होणार मतमोजणी

 • 30 Jan 2023 08:05 AM (IST)

  नाशिक पदवीधर मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पडणार पार

  2 लाख 62 हजार 731 मतदार बजावणार मतदानाचे हक्क

  नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर होणार मतदानाची प्रक्रिया

  सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात

  नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होणार

 • 30 Jan 2023 08:04 AM (IST)

  पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी धुळे जिल्ह्यात एकूण 29 मतदान केंद्र

  धुळे जिल्ह्यात एकूण 23412 मतदार

  सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार मतदान

  सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान

  महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील करणार महापालिकेच्या शाळा क्रमांक 8मध्ये मतदान

 • 30 Jan 2023 07:50 AM (IST)

  पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी धुळ्यात एकूण 29 मतदान केंद्र

  धुळे : धुळे जिल्ह्यात एकूण 23412 मतदार,

  सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार मतदान,

  सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान,

  महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील करणार महापालिकेच्या शाळा क्रमांक आठ मध्ये मतदान.

 • 30 Jan 2023 07:02 AM (IST)

  काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप

  श्रीनगर : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार,

  श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात सभा घेऊन यात्रेचा समारोप,

  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील त्यांनतर 11.30 वाजता सभेला सुरुवात होणार,

  काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना निमंत्रण,

  राहुल गांधी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष.

 • 30 Jan 2023 07:01 AM (IST)

  धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? आजचा दिवस महत्वाचा

  धनुष्यबाण चिन्ह कुणाचे ?

  निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट लेखी म्हणणं मांडणार

  निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपणार

  प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष

  निवडणुक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार

 • 30 Jan 2023 06:44 AM (IST)

  नाशिकच्या सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात एकाच घरातील तिघांची गळफास घेत आत्महत्या

  दीपक शिरोडे (वडील), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५ ), राकेश शिरोडे (वय २३) यांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत गळफास घेतला

  दीपक शिरोडे यांचा अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय

  पत्नी आणि आई दुपारी कामानिमित्त गेल्या होत्या बाहेर

  त्या घरी आल्यावर प्रकार आला समोर

  घटना स्थळी सातपूर पोलीस दाखल

  आर्थिक कारणावरून तिघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती...

 • 30 Jan 2023 06:34 AM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक

  आज सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहात बोलावली बैठक

  आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुद्यांवर मुख्यमंत्री करणार खासदारांशी करणार चर्चा

  ठाकरे गटाचे खासदार बैठकीला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता

 • 30 Jan 2023 06:32 AM (IST)

  नवी मुंबईतील तळोजा येथील कारखान्याला आग

  तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला आग लागली

  अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले

  अद्याप आगीचे कारण अस्पष्ट

 • 30 Jan 2023 06:30 AM (IST)

  नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेत मजुराचा सात वर्षाचा चिमुकला ठार

  निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील घटना

  रोहन हिरामण ठाकरे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचे नाव

  आई-वडिलांसमोरच मक्याच्या शेतात ओढून नेते केले बिबट्याने ठार

  या घटनेमुळे नरभक्षक बिबट्याची म्हाळसाकोरे गावाच्या परिसरात दहशत

  या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

 • 30 Jan 2023 06:27 AM (IST)

  अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी आज पार पडणार मतदान

  एकूण 23 उमेदवार रिंगणात

  2 लाख 6 हजार 177 पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप उमेदवार डॉ रणजित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

  भाजपचे डॉ रणजित पाटील विरुद्ध मविआचे धिरज लिंगाडे यांच्यात लढत

  अमरावती पदवीधर मतदारसंघात एकूण 262 मतदान केंद्रे

  2 तारखेला मतमोजणी आणि निकाल

Published On - Jan 30,2023 6:23 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI