AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत पहिली मोठी फुट, काहीही झालं तरी युती नाहीच, बड्या नेत्याची थेट घोषणा!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता महायुतीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. महायुतीत बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीत पहिली मोठी फुट, काहीही झालं तरी युती नाहीच, बड्या नेत्याची थेट घोषणा!
ajit pawar and eknath shinde and devendra fadnavis
| Updated on: Nov 10, 2025 | 5:37 PM
Share

Nashik Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता युती आणि आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांत मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत आपल्याच पक्षाची सरशी व्हावी यासाठी सर्वच बडे नेते प्रयत्नरत आहेत. नाशिकमध्ये तर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे 11 नगरपरिषदांपैकी एकूण 3 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी महायुतीत उभी फुट पडली आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी काहीही झालं तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती करणार नाही, असं थेट जाहीर करून टाकलं आहे. विशेष म्हणजे भाजपालाही नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समेट घडवून आणणे अशक्य असल्याचे वाटत आहे.

नाशिकमध्ये महायुतीत फुट, समीर भुजबळ काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी आज (10 नोव्हेंबर) भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत युतीबाबत चर्चा करण्यात आली. ही भेट झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीची नगपरिषदेची रणनीती त्यांनी स्पष्ट केली. येवल्यात आमच्या राष्ट्रवादी पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. परंतु काहीचं म्हणणं आहे की भाजपासोबत ही निवडणूक लढवली तर ते सोईचं राहील. येवल्यात शिंदे गटाची काही ताकद नाही. ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे तिथे आम्ही त्यांच्यासोबत युती करू शकत नाही, अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली. तसेच, मनमाड आणि नांदगावमध्येही अशीच स्थिती आहे. तेथे शिंदे गट आमचा विरोधक आहे. त्यामुळे तिथे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असे समीर भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

गिरीश महाजन यांनीही दिला दुजोरा

तर दुसरीकडे आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार सुहास कांदे मला भेटून गेले आहेत. तासाभराने समीर भुजबळ हेदेखील मला भेटून गेले आहेत. आम्ही सर्वांशी चर्चा करत आहोत. नाशिक जिल्ह्याती नगरपालिका, नगरपरिषदा आहेत, त्या सोबत लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे साहजिकच ते वेगळे लढतील, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकध्ये तीन नगरपरिषदांसाठी महायुतीत उभी फुट पडल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले असून तेथे नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.