Chhagan Bhujbal: महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, नाराज छगन भुजबळ यांचा मोठा निर्णय, नक्की काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकेकाळी शरद पवारांची साथ सोडून सत्तेत सहभागी होणाऱ्या अजित पवारांना खमकी साथ देणारे छगन भुजबळ यांनादेखील अजित पवारांनी आता मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे आता भुजबळ आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. यानंतर आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. “मी उद्या येवला-लासलगाव येथे जाऊन लोकांशी बोलणार आहे. समता परिषदच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार. मी आता अधिवेशनाला जाणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे भुजबळ आता काय निर्णय घेतील? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भुजबळांनी नागपूर अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय घेणं देखील मोठाच निर्णय आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुजबळ आता खरंच बंड पुकारणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाराज छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये येत्या 18 डिसेंबरला बुधवारी सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे. राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याा उपस्थित राहणार आहेत. नाराज छगन भुजबळ मेळाव्यात काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आहेत. ते आक्रमक नेते आहे. विशेष म्हणजे ते प्रचंड अनुभवी आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी पक्षाची वैयक्तिक मोठी हानी होऊ शकते. भुजबळांच्या या हालचाली पाहता आता तरी पक्षाचे प्रमुख अजित पवार त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भुजबळांचा उद्या येवला दौरा
दरम्यान, छगन भुजबळ उद्या सकाळी 11 वाजता येवला दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निकालानंतर प्रथमच छगन भुजबळ मतदारसंघातील येवला येथे जाणार आहेत. ते येवल्यातील संपर्क कार्यालय येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
