AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद, मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil: ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद, मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: May 20, 2025 | 12:44 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ मंगळवारी घेतली. त्यावेळी भुजबळ यांचे कट्टर विरोधक अन् मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. परंतु, अजित पवार जातीवादी लोकांना पोसायचे काम करत आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी की नाही? हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु अजित पवार मोठी चूक करत आहेत. या चुकीच्या परिणामाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिले जात आहे. भुजबळ मंत्री होत असल्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.

सर्व आमदारांकडून विरोध हवा होता

अजित पवार यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत. त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्यामुळे छगन भुजबळ यांना तात्पुरता आनंद दिला असणार आहे. छगन भुजबळ यांना चॉकलेट दिले असणार आहे. परंतु लवकरच छगन भुजबळ यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. छगन भुजबळ जातीयवादी आहेत. त्यांना मंत्रिपद देऊ नका, असा विरोध अजित पवार यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, छगन भुजबळला मंत्रीपद देणे हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव असू शकतो. मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणले. परंतु आता एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी बाहेर टाकले आहे.

..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....