AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावर थांबतात तेव्हा…..

दत्तात्रय भरणे यांनी या सर्व गोष्टींचा बडेजाव न करता आज इंदापुरात रस्त्यावरच चहा घेत मंत्री झाल्यानंतर देखील आपला साधेपणा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. | Dattatray Bharane

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावर थांबतात तेव्हा.....
दत्तात्रय भरणे हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. इंदापुरातील त्यांच्या साधेपणाच्या एका कृतीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
| Updated on: Jan 26, 2021 | 8:18 PM
Share

पुणे: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. इंदापुरातील त्यांच्या साधेपणाच्या एका कृतीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भरणे (Dattatray Bharane) यांना मंत्रीपद दिले तरीही त्यांनी त्यांचा साधेपणा सोडलेला नाही. (Dattatray Bharane drinks tea on road stall in Pune)

एरवी मंत्री म्हटलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफ़ा आणि त्यातून सर्व सामान्य कार्यकर्त्यांची होणारी अवहेलना असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सर्व गोष्टींचा बडेजाव न करता आज इंदापुरात रस्त्यावरच चहा घेत मंत्री झाल्यानंतर देखील आपला साधेपणा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर जिल्ह्याचा नियोजित दौरा आटोपून इंदापूरमार्गे जात असताना इंदापूर शहरात जुन्या मार्केट यार्डसमोर काही नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या घोळक्यातच चहाचा आस्वाद घेतला.

रागाच्या भरात महिलेने पकडली दत्ता भरणेंची कॉलर

गेल्या महिन्यात एका महिलेने रागात येऊन भरणे यांचा शर्ट पकडीत जाब विचारल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, तेव्हादेखील दत्तात्रय भरणे यांनी शांतपणे हा प्रसंग हाताळला होता. तो व्हीडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

पृथ्वीराजबाबा मानलं… जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याबाबत सोमवारी घडलेल्या एका किस्स्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण सोमवारी कराडच्या सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले.

यावेळी चौकशी केली असता या रस्त्यावर झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांना समजले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी गाडीतून खाली उतरत वृद्धेची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील एक गाडी देऊन या वृद्ध महिलेला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

संबंधित बातम्या:

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दत्तामामा म्हणाले ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल

पृथ्वीराजबाबा मानलं… जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात

(Dattatray Bharane drinks tea on road stall in Pune)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.