AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganpat Gaikwad Firing | हे नाही पटलं, पोलीस ठाण्यातील गोळीबारावर अजित पवार स्पष्ट बोलले

Ganpat Gaikwad Firing | पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा धिंडवडे निघाले आहेत. आता सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांनी या विषयावर स्पष्टपणे आपल मत मांडलय.

Ganpat Gaikwad Firing | हे नाही पटलं, पोलीस ठाण्यातील गोळीबारावर अजित पवार स्पष्ट बोलले
ajit pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 03, 2024 | 10:50 AM
Share

Ganpat Gaikwad Firing | राज्यातील पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष गोळीबाराची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने हा गोळीबार केला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदांरासाठी नियम वेगळे आहेत का? असे प्रश्न विचारले जात आहेत. राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीवर टीका सुरु झाली आहे. खासकरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहेत. कारण ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यांच्या पक्षाच्या आमदाराने हा गोळीबार केलाय.

महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जागेच्या वादातून ही फायरींग केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या.

अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या घटनेवर भाष्य केलं आहे. “कोणाबद्दल तक्रार असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे. पण हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात घडल्याची मला प्राथमिक माहिती मिळालीय” असं अजित पवार यांनी सांगितलं. “देवेंद्र फडणवीस राज्ययााचे उपमुख्यमत्री आहेत, मी त्यांचाशी बोलणार आहे. एवढी टोकाची मजल का मारली?. टीव्ही चॅनलशी फोनवरुन काही संभाषण जे केलं, ते कायद्याला धरुन अजिबात नाही. हे माझं स्पष्ट मत आहे” असं अजित पवार म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.