20 दिवस कमी लसीकरण करून मोदींच्या वाढदिवशी विक्रम साधला; मलिक यांची खोचक टीका

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा-वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

20 दिवस कमी लसीकरण करून मोदींच्या वाढदिवशी विक्रम साधला; मलिक यांची खोचक टीका
NAWAB MALIK
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 5:28 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी देशात तब्बल अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले. यानिमित्ताने काही लोकांनी या मोहिमेचे कौतुक केले. तर यापुढेही असेच विक्रमी लसीकरण व्हावे अशी इच्छा व्यक्त करत, मोदींच्या वाढदिवशीच अडीच कोटी लोकांना लस मिळाली. रोज का नाही ? असा अप्रत्यक्ष सवाल काही लोकांनी केला. याच पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा-वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले, असी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केली. तसेच आधीचे पंधरा ते वीस दिवस लसीकरण कमी करणे चुकीचे आहे, असेही मलिक म्हणाले. (ncp leader nawab malik criticize pm narendra modi birthday celebration and vaccination program)

आधीचे वीस दिवस लसीकरण कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. या दिवशी अडीच कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. यावर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मोदींच्या वाढदीवशी विक्रमी लसीकरण करता यावे म्हणून आधीचे वीस दिवस लसीकरण कमी करण्यात आले. तसेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जर पावणेतीन कोटी लसीकरण झाले, तर आज आणि उद्या का नाही ? असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

एका व्यक्तीसाठी असा कार्यक्रम घेणे योग्य नाही

तसेच पुढे बोलताना हेच लसीकरण पहिल्यांदा केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता. मात्र एखाद्या व्यक्तीसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी भाजपच्या लसीकरण मोहिमेवर टीका केली.

मोदींच्या वाढदिवशी विशेष लसीकरण मोहीम

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पार्टीकडून मेगा कोरोना लसीकरण मोहीम चावलण्यात आली. या कार्यक्रमामुळे लसीकरणाचा नवा विक्रम तयार झाला. 17 सप्टेंबर रोजी 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. या दिवशी दुपारी अडीच वाजता सव्वा कोटी, साडे तीन वाजता 1 कोटी 60 लाखाच्या पुढे लसीकरण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. तसेच या दिवशी मेगा लसीकरणाचा कार्यक्रम देशभरात राबवला जाईल, असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं.

इतर बातम्या :

महाविकासआघाडी सरकार आणि महावितरण मुघलांसारखं वागतंय, शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आंदोलनाचा इशारा

खबरदार साक्ष फिरवलीत तर!!! हत्या प्रकरणी फितूर आई-मुलावर खटला भरण्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाचे आदेश

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

(ncp leader nawab malik criticize pm narendra modi birthday celebration and vaccination program)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.