AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या ‘लेडी जेम्स बॉन्ड’चा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. त्यांच्या पक्षाच्या 'लेडी जेम्स बॉन्ड' अशी ख्याती असलेली युवा नेता उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं मोठं राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या 'लेडी जेम्स बॉन्ड'चा मोठा निर्णय
शरद पवार आणि अजित पवार
| Updated on: Aug 05, 2024 | 9:00 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसाठी हा धक्का आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सोनिया दुहान यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकादेखील केली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. पण तसं काही घडलं नाही. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांचीदेखील भेट घेतली होती. पण त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला नव्हता. अखेर सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत सोनिया दुहान या उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया दुहान यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. सोनिया दुहान या हुशार आणि ताकदवान युवा नेत्या आहेत. सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. त्यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. पण त्यांचा प्रयत्न अयश्वशी ठरला.

अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.

सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर काय आरोप केले होते?

सोनिया दुहान यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत, असं सोनिया दुहान म्हणाल्या होत्या. तर सुप्रिया सुळे यांच्या जवळचे लोक कटकारस्थान रचत असल्याचा आरोप सोनिया दुहान यांनी केला होता. “मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. मी सध्या एकनिष्ठतेने बसले आहे. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केला होता.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.