AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास.. सुनील तटकरे यांचे थेट मोठे विधान, अंतर्गत गोष्टींवर..

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हातात घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसत आहे. यादरम्यान सुनील तटकरे यांनी अत्यंत मोठे विधान केले. त्यांनी थेट संकेत दिले आहेत.

माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास.. सुनील तटकरे यांचे थेट मोठे विधान, अंतर्गत गोष्टींवर..
Sunil Tatkare
| Updated on: May 16, 2026 | 10:52 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदासोबतच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवार यांना समज द्यावी म्हणत थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. यासोबतच अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाची महत्वाची पदे सोपवली. यासोबतच सुनील तटकरे देखील अचानक शरद पवार यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात सर्वकाही अलबेल नसल्याचे येणाऱ्या घडामोडींवरून दिसत आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मात्र, सुनील तटकरे यांनी त्या भेटीनंतर म्हटले की, मी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले होतो. सुनील तटकरे यांच्या भेटीवर भाष्य करणे शरद पवारांनी टाळले.

यादरम्यानच आता सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले. सुनील तटकरे यांनी म्हटले की, माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी बोलेल. मला राजकीय बोलायचे त्यावेळी मी नक्की बोलेल. माझा गेल्या 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करायचा आहे.

पक्षाचे प्रमुख नेते आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू. आमचे धोरण एनडीएमधील आहे. आम्हाला एनडीए मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. त्याकरिता प्रफुल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, वळसे पाटील असतील आणि छगन भुजबळ असतील आम्ही एकत्रपणे बसू. प्रत्येकवेळी राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात.

काही गोष्टी निर्माण होतात. चर्चेतून मार्ग निघत असतो. आमच्या सगळयांचे उद्धिष्ट एक आहे, त्याकरिता आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि वाटचाल करू. यावेळी सुनील तटकरे देखील सूचक विधान करताना दिसले. सुनील तटकरे थेट यादरम्यान त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना दिसले. आज शरद पवार बारातमी दाैऱ्यावर असताना त्यांनी तटकरे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?