AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasan Mushrif : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य, यात पंतप्रधान मोदी आणि अमित शाहच..

Hasan Mushrif : "लाडक्या बहिणीना सरसकट पैसे द्यायचे होते, यात सरसकट कसं देता येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत क्षेत्र, पीक नुकसान याची माहिती तर घ्यावीच लागेल" असं हसन मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य, यात पंतप्रधान मोदी आणि अमित शाहच..
Hasan Mushrif
| Updated on: Sep 24, 2026 | 11:58 AM
Share

भूषण पाटील, प्रतिनिधी : “परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ परिस्थितीवर गांभीर्याने चर्चा झाली. दोन-तीन दिवसात मदतीचा शासन निर्णय काढणे आणि तुम्ही धीर धरा असा संदेश देण्याचे ठरलं आहे. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुष्काळ दौरा करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत सरकार तुमच्या मागे उभे आहे असं सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत. किती नुकसान झालेलं आहे, हे विरोधकांना देखील माहित आहे. शास्त्रशुद्ध तपासणी झाल्याशिवाय नुकसानीचा अंदाज येत नाही. मात्र विरोधकांना यात राजकारण करायचं आहे. बुधवारपासून पंचनामे सुरू होतील आणि केंद्राच्या निधीची वाट न बघता आम्ही शेतकऱ्यांना मदत करू” असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

“कोणत्याही मंत्र्याला असणारे अधिकार हे मंत्रिमंडळाचे अधिकार आहेत. धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळालाच आहे. कृषिमंत्री प्रभावीपणे काम करत आहेत. त्यामुळे जनतेचा रोष कमी होतोय. याचंच दुःख रोहित पवार यांना होतय” हसन मुश्रीफ म्हणाले. “आम्ही ज्या पद्धतीने करत आहोत, तशीच प्रक्रिया कर्नाटक सरकारने देखील केली आहे. ज्या तालुक्यात जास्त दुष्काळ आहे अशा तालुक्यांचा जीआर काढला आहे. पंचनामे पूर्ण होताच महाराष्ट्र मध्ये देखील जी आर निघेल” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

यात सरसकट कसं देता येईल

“मी कोणतं पीक लावलं होत. त्याचं किती नुकसान झाल आहे. त्याची भरपाई किती द्यायची ही माहिती घ्यायला नको का?. लाडक्या बहिणीना सरसकट पैसे द्यायचे होते, यात सरसकट कसं देता येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत क्षेत्र, पीक नुकसान याची माहिती तर घ्यावीच लागेल” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

..तर तेच आमदार होतील

“गेल्या तीन-चार निवडणुकांमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. मागच्या वेळचे उमेदवार अरुण लाड यांनी पुढच्या वेळी मी निवडणूक लढवणार नाही असं स्वतः सागितलं होतं. पुढच्या वेळी भैय्या माने यांनी निवडणूक लढवावी अस ते म्हणाले होते. आता अरुण लाड याचा मुलगा भारतीय जनता पार्टी मध्ये गेला आहे. आता पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न करावे लागतील. भैय्या माने गेली २० वर्ष या मध्ये काम करत आहेत. त्यांनी पदवीधरांची नोंदणी सर्वाधिक केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर तेच आमदार होतील. या निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होईल त्यातून मार्ग निघेल” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

हेच ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त होते

“निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह योग्य तोडगा काढतील. तेलंगण, कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार आलं त्यावेळी हेच ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त होते. मुख्यमंत्र्यांनी देखील तसा खुलासा केला आहे” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही

“गोकुळबाबत दोन दिवसात महायुतीची बैठक होईल आणि या बैठकीत 80 टक्के जागा वाटपावर एकमत होईल. ज्यावर ऐकमत होणार नाही त्यावर मुख्यमंत्री तोडगा काढतील. गोकुळ मध्ये मोठा भाऊ राष्ट्रवादी आहे, हे या आधीच ठरलेलं आहे आणि ते सर्वांनी मान्य केलेलं आहे. कोणाला किती जागा मिळतील यावर आज भाष्य करणार नाही. गोकुळ बाबत माहिती मधील वाद आता संपले आहेत. निवडणुकीत एकत्र सामोरे जाऊ. गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत कोण काय बोलले याला महत्व नाही. गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार