AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार गरिबांची थट्टा करतंय; मॅनहोल दुर्घटनेवरून रोहित पवार भडकले, निष्काळजीपणाचा सगळा हिशोब मांडला

मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे. दुसरीकडे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साकिनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकावर संताप व्यक्त केला आहे. सरकार गरिबाची थट्ट करतंय, असं म्हणत रोहित पवार यांनी […]

सरकार गरिबांची थट्टा करतंय; मॅनहोल दुर्घटनेवरून रोहित पवार भडकले, निष्काळजीपणाचा सगळा हिशोब मांडला
| Updated on: Jul 03, 2026 | 11:47 AM
Share

मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू आहे. दुसरीकडे दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साकिनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकावर संताप व्यक्त केला आहे. सरकार गरिबाची थट्ट करतंय, असं म्हणत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.

मुंबईच्या साकिनाक्यातील मॅनहोल दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘मुंबईला किती अधिकाऱ्यांची गरज होती आणि किती अधिकारी देण्यात आले, याचा अभ्यास केला पाहिजे. पालिकेचे मोठे अधिकारी हे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रकरण ढकलून मोकळे होत आहेत. हे योग्य नाही. बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. वर्षभरात मॅनहोलवर जाळी लावणे, गटार साफ करणे यासाठ अडीचशे कोटी रुपये महापालिका खर्च करत असते. अडीचशे कोटी खर्च करूनही जाळ्या व्यवस्थित लावल्या जात नाहीत’.

‘जून महिन्यात पाऊस येतो, त्यामुळे मे महिन्यात सर्व कामे व्हायला पाहिजे होते. दुर्दैवाने ते काम झालं नाही. तर हे अयोग्य आहे. मॅनहोलला शंभर टक्के जाळ्या लावण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मग आतापर्यंत जाळ्या का लावल्या नाहीत? दरवर्षी सहा ते सात जण मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडतात. या घटनेला महापालिका जबाबदार आहे. पालिकेवरील सत्ताधारी जबाबदार आहेत. सामान्य लोक मॅनहोलमध्ये पडत आहेत. लहान मुलांच्या अंगावर झाडे पडत आहेत. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे विधानसभेत येऊन थट्टा करत आहेत. हे सरकार निर्लज्ज झालं आहे. यांना गरीबांचं पडलं नाही, असं आमचं ठाम मत आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसहित इतर अधिकाऱ्यांनाही दोषी धरलं पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी महायुती सरकावर टीका केली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ