AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केलीय. Nilesh Lanke Covid Care centre

माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं
निलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Apr 27, 2021 | 4:54 PM
Share

अहमदनगर: “माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे आहेत. मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सेवेचा निर्धार त्यांनी केलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केलीय. (NCP Parner MLA Nilesh Lanke successfully run Covid Care centre for corona patients in Ahmednagar)

आमदारांकडून नियमित देखभाल

अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोविड सेंटर सुरू केल्यापासून आतापर्यंत भरभरून मदत या सेंटर ला मिळाली आहे.

लोकप्रतिनिधीचं खर काम काय असते?

ना कोणता थाट…. ना कोणता रुबाब….. जनसामान्यांचा आधार अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादीची आमदार निलेश लंके सध्या आपल्या कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याच कारणही तसेच आहे. लोकप्रतिनिधीचं खर काम काय असते हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 बेडच कोविड सेंटर उभारले आहेय. त्यात 1000 बेड आणि ऑक्सिजन युक्त 100 बेड आहेत.

विशेष म्हणजे ते येवढ्या थांबले नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची ते आस्थेने विचारपूस करतात. तर, स्वतः ताप आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासतात. लंके यांच्या आवाहनाला दाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी 30 लाख रुपयांची मदत तर केली. मात्र, 5 ट्रक धान्य देखील जमा झाले आहे. या कोविड सेंटर मध्ये आतापर्यंत हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो कुटुंब प्रमुख असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केलीय.

आमदार काळजी घेत असल्यानं रुग्णांना आधार

कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत सर्व देखभाल करण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळं दिली जातात. सकाळी अंडे आणि दूध, नाष्टा, भाजीपाला तर दुपारी आणि संध्याकाळी नॉनव्हेज तसेच शाकाहारी जेवण दिले जाते.रुग्णांच्या मंनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात, तर सकाळी योगा देखील घेतला जातो. दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येते. यात आमदार निलेश लंके आघाडीवर असतात ते. त्यामुळे स्वतः आमदारच आपल्या तब्बेतीची काळजी घेतो म्हटल्यावर रुग्णांना देखील मोठा आधार मिळतो. आपल्या लोकप्रतिनिधीची ही सेवा पाहून रुग्ण देखील भारावून जातात.

परदेशातून मदतीचा ओघ

आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर असे नाव दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्यामार्फत सुरु केलेल्या आरोग्य केंद्रांची महती सर्वदूर पोहोचली. त्यामुळे मदतीचा ओघही सुरुच आहे. परदेशातून अनेक जण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. तर माझ्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत इतका प्रतिसाद मी पहिला नाही, असं मत लंके यांनी व्यक्त केलेय. माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माजी लोक सुरक्षित असली पाहिजे असा निर्धार लंके यांनी केलाय.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोविड सेंटरची उभारणी

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील लंके यांनी एक हजार बेडचं कोविड सेंटर उभारलं होत. त्याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली होती. लंके यांना भेट म्हणून कार्डियाक ॲम्बुलन्स भेट दिली होती. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, मात्र लंके यांच्या सारखी प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर या संकटातून बाहेर पडण्यास हार फार वेळ लागणार नाही, अशी भावना मतदारसंघातील नागरीक व्यक करत आहेत.

संबंधित बातम्या:

आमदार निलेश लंके यांनी करुन दाखवलं, शरद पवारांच्या नावाने दुसऱ्यांदा उभारलं 1 हजार बेडचं कोविड सेंटर

आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!

(NCP Parner MLA Nilesh Lanke successfully run Covid Care centre for corona patients in Ahmednagar)

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.