AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बडा नेता भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रीवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे, बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बडा नेता भाजपच्या वाटेवर?
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 21, 2024 | 5:06 PM
Share

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली. महायुतीनं पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष मिळून केवळ पन्नास जागाचं जिंकता आल्या, ज्यामध्ये काँग्रेला 16, शिवसेना ठाकरे गटाला 20 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी 10 जागा मिळाल्या. दरम्यान नवं सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.

त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश माहजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यसाठी इच्छूक होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं की, देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये.  देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही? याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजत असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता  देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात, भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

Follow Us
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी