AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं गुजरात कनेक्शन? रोहित पवार यांचा आरोपांचा धुरळा

Rohit Pawar on NEET Paper Leak Gujrat Connection: शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात त्यांनी गंभीर आरोप केला आहे. नीट फेरपरीक्षेचा पेपरही अगोदरच फुटल्याचे आणि त्याचे गुजरात कनेक्शन असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे.

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं गुजरात कनेक्शन? रोहित पवार यांचा आरोपांचा धुरळा
रोहित पवार, नीट फेरपरीक्षा
| Updated on: Jul 29, 2026 | 12:35 PM
Share

UG-NEET 2026 परीक्षेबाबत देशभरात वादंग उठले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. केंद्रीय शिक्षण मंत्री बदलला. पण आरोपांची राळ सुरूच आहे. नीटची फेर परीक्षा घेण्यात आली. त्याविषयी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या ताज्या आरोपांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. नीट पेपर लीक पुनर्परिक्षेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी या पेपरफुटीचं गुजरात कनेक्शन समोर आणले आहे. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.

ट्विटरवरून सरकारवर हल्लाबोल

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून एक खळबळजनक ट्विट केले आहे. त्यात युजी नीटच्या फेर परीक्षेवरही मोठा आक्षेप घेण्यात आला आहे. फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस अगोदरच फुटला आणि त्याचे गुजरात कनेक्शन समोर येत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

“NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे. तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं, ही विनंती. या पेपरफुटीसंदर्भात पुढं आलेले स्किन शॉट, मेल, संभाषण हे सगळं सोबत दिलेल्या लिंकवर गेल्यास पहावयास मिळेल.” असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.

कागदपत्रे, ई-मेलचा पुरावा

आमदार रोहित पवार यांनी आरोपाच्या पुष्ट्यर्थ काही कागदपत्रे आणि एक ईमेल ट्विट केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याविषयीचे स्क्रीन शॉट , मेल, संभाषण या सगळ्यांची लिंक देखील त्यांनी ट्विट केली आहे. जर नीटची फेरपरीक्षेचा पेपर अगोदरच गुजरातमध्ये फुटल्याचे खरे असेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

संसदेसमोर अँटी पेपर लीक कायदातील सुधारणांवर चर्चा सुरू आहे. पण त्यात दुसरेच मुद्दे उपस्थित होत असल्याने संसदेचे कामकाज वारंवार तहकूब होत आहे. त्यातच आता नीटच्या फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा खरा असेल तर विरोधकांना सरकारविरोधात मोठे कोलीत मिळणार आहे. दरम्यान या नवीन दाव्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.

Follow Us
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...