AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या निधनानंतर वकिलाचं मुंडन, भाजपची शेरेबाजी; कोर्टाच्या परिसरातच टिंगलटवाळी

मुंबईः शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भजप आमदार नितेश राणे यांना अटक होऊन त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधान आले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल होऊन ज्यांच्या युक्तीवादामुळे नितेश राणे यांना अटक (Arrested) होऊन पोलीस कोठडी मिळाली आहे, त्या विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यावर न्यायालयीन आवारात भाजप […]

आईच्या निधनानंतर वकिलाचं मुंडन, भाजपची शेरेबाजी; कोर्टाच्या परिसरातच टिंगलटवाळी
pradip Gharat
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 12:24 PM
Share

मुंबईः शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भजप आमदार नितेश राणे यांना अटक होऊन त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधान आले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल होऊन ज्यांच्या युक्तीवादामुळे नितेश राणे यांना अटक (Arrested) होऊन पोलीस कोठडी मिळाली आहे, त्या विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यावर न्यायालयीन आवारात भाजप कार्यकर्त्यांनी टिंगलटवाली केली असल्याचे वृत्त सामनामध्ये छापून आले आहे. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मनाचीही सोडली असल्याची टीका करण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या आईचे निधन झाले असतानाही न्यायालयीन परिसरात त्यांच्यावर शेरेबाजी करणे चुकीचे असल्याचे वृत्तही त्यांनी छापले आहे

राज्य सरकारने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे. सुनावणी दरम्यान वकील घरत यांच्या आईचे 26 जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी आईचे निधन झाले म्हणून मुंडन केले. बुधवारी आईचा दशक्रिया विधी असल्याने त्यांनी ऑनलाईन युक्तीवाद करून सरकारी पक्षाची बाजू जोरदार पणे लावून धरली. त्यामुळेच नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सुनावणी सुरु असतानाच सरकारी वकील घरत यांची टिंगलटवाळी करत हुल्लडबाजी केली. यावेळी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजीही केले असल्याचे वृत्त सामना वृत्तपत्रामध्ये छापून आले आहे.

भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानंतर सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत सोमवारी कणकवलीमध्ये आले होते. त्यांनी सोमवारी व मंगळवारी चाललेल्या न्यायालयीन कामकाजात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. यावेळी घरत यांच्या युक्तिवादानंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी न्यायालयात परिसरातच हुल्लडबाजी केली. 26 जानेवारी रोजी प्रदीप घरत यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी मुंडन केले होते. घरत यांच्या मातोश्रीचे निधन झाल्यामुळे त्यांनी मुंडन केले होते, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्या परिस्थितीचे भान न ठेवता त्यांची टिंगलटवाळी केली. ही मानहानी सुरु असतानाही त्यांनी ऑनलाईन युक्तिवाद केल्यानंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दबावाला बळी पडणार नाही

या शेरेबाजीनंतर सामनामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. न्यायालयीन काम करताना असे दबाव येणे, कामापासून लक्ष विचलित करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे याआधीही मी दबावाला बळी पडलो नाही आणि यापुढेही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Yamini Khairnar | कर्नाटक पोलिसांचे प्रसिद्ध सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन, पोलिसात तक्रार

Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?

Pune Building Slab Collapse Live : पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.