Yamini Khairnar | कर्नाटक पोलिसांचे प्रसिद्ध सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन, पोलिसात तक्रार

RTPCR टेस्ट रिपोर्टच्या नावाखाली पैसे खैरनार यांना दमबाजी करण्यात आली आहे. या प्रकारानंतर मात्र खैरनार यांनी कर्नाटकच्या पोलिसांना चांगलाच दणका दिलाय. त्यांनी कर्नाटकच्या अफझलपूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामिनी खैरनार या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सायकलपटू आहेत.

Yamini Khairnar | कर्नाटक पोलिसांचे प्रसिद्ध सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी गैरवर्तन, पोलिसात तक्रार
yamini khairnar and corona test
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 12:12 PM

नाशिक : प्रसिद्ध सायकलपटू यामिनी खैरनार (Yamini Khairnar) यांच्यासोबत कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर कोरोना (Corona) चाचणीच्या नावाखाली त्यांच्यासोबत हा प्रकार घडलाय. ही सर्व घटना त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली असून गैरवर्तन झाल्याचा आरोप खुद्द खैरनार यांनीच केला आहे. RTPCR टेस्ट रिपोर्टच्या नावाखाली पैसे मागत खैरनार यांना दमबाजी करण्यात आली आहे. या प्रकारानंतर मात्र खैरनार यांनी कर्नाटकच्या पोलिसांना चांगलाच दणका दिलाय. त्यांनी कर्नाटकच्या अफझलपूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामिनी खैरनार या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सायकलपटू आहेत. त्यांनी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांकडे ओळखपत्र आणि युनिफॉर्म नसल्याचा आरोप केला. तसेच कर्नाटक पोलीस नियमबाह्य पद्धतीने गाड्या अडवून प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याचं खैरनार यांनी म्हटलंय.

RTPCR टेस्ट रिपोर्टच्या नावाखाली पैसे मागून दमबाजी

यामिनी खैरनार या प्रसिद्ध अशा सायकलपटू आहेत. त्यांनी सायकलिंगमध्ये आतापर्यंत अनेक पारितोषके जिंकलेली आहेत. मात्र कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर त्यांना वाईट अनुभव आला. कोरोना चाचणीच्या नावाखाली कर्नाटक पोलीस प्रवाशांना आडवत आहेत. तसेच आरीटपीसीआर चाचणीच्या नावाखाली कर्नाटक पोलीस पैसे उकळत असल्याचे खैरनार यांनी म्हटलंय. खैरनार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्याचा संपूर्ण व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला आहे. तसेच कर्नाटकच्या अफझलपूर पोलीस ठाण्यात यामिनी खैरनार यांनी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे युनिफॉर्म नाही तसेच पोलिसांकडे कोणतेही ओळखपत्र नाही. तरीदेखील कर्नाटक पोलीस नियमबाह्य पद्धतीने प्रवाशांच्या गाड्या अडवून पैसे उकळत आहेत. असं खैरनार यांनी म्हटलंय.

कर्नाटक पोलिसांची कोल्हापुरात येऊन कारवाई

दरम्यान कर्नाटक पोलिसांनी थेट कोल्हापुरात येऊन बानावट कोरोना रिपोर्ट तयार करणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांविरोधात थेट कारवाई केली आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात 12 जणांना अटक केलंय. यावेळी कर्नाटक पोलिसांनी कोरोना चाचणीचा बनावट रिपोर्ट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अटक केलंय. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापुरात ही येऊन ही कारवाई केली.

ट्रॅव्हल्स कंपन्या द्यायच्या बनावट कोरोना रिपोर्ट 

ही कारवाई कर्नाटकमधील निपाणी ग्रामीण पोलिसांनी केली. त्यासाठी निपाणीचे सिपीआय प्रवाशी बनून आले. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करत त्यांनी RTPCR रिपोर्ट देणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीचा पर्दाफाश केला. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रॅव्हल्स कंपन्या बनावट रिपोर्ट बनवून देत होत्या.

इतर बातम्या :

Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?

‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पाहिजे, मराठी कलाकार नडला की बाजार उठवतो’, किरण माने यांची नवी फेसबुक पोस्ट

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....