AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पाहिजे, मराठी कलाकार नडला की बाजार उठवतो’, किरण माने यांची नवी फेसबुक पोस्ट

Kiran Mane : अभिनेते किरण माने आज दुपारी साडे तीन वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याअगोदर त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजच्या पत्रकार परिषदेत काय धमाका होणार आहे, याचा ट्रेलर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

'त्या माजोरड्यांना मेसेज गेला पाहिजे, मराठी कलाकार नडला की बाजार उठवतो', किरण माने यांची नवी फेसबुक पोस्ट
अभिनेते किरण माने
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 10:56 AM
Share

मुंबई : अभिनेते किरण माने (Kiran Mane) आज दुपारी साडे तीन वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याअगोदर त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजच्या पत्रकार परिषदेत काय धमाका होणार आहे, याचा ट्रेलर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. समस्त मराठी कलाकारांनो, मी तुमच्यासाठी लढतोय. माझ्या लढाईत मी जिंकल्यानंतर, तुम्हाला एका फोनवर उद्यापासून तू या सिरीयलमध्ये-नाटकात नसशील, असं सांगायची हिम्मत कुठलंच प्रॉडक्शन हाऊस करणार नाही, असं ठणकावून सांगत आजच्या पत्रकार परिषदेत माझे वकील असिम सरोदे (Asim Sarode) आणि मी अशा तीन कायदेशीर बाबींवर बोलणार असल्याचं किरण माने यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितलं आहे.

अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्यानंतर प्रोडक्शन हाऊस, मालिकेतील कलाकार, ट्रोलर, नेतेमंडळी यांच्यात जवळपास एक आठवडा खडाजंगी रंगली होती. मालिकेतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मानस किरण माने यांनी बोलून दाखवला होता. काल या दुसऱ्या लढ्याची घोषणा केल्यानंतर तसंच अनेकांची गुपितं उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर आज पुन्हा फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“आज दुपारी साडे तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लबला. मी आणि माझे वकील असिम सरोदे… समस्त मराठी कलाकारांनो, मी तुमच्यासाठी लढतोय. एक कलाकार म्हणून तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहिले असाल किंवा नसाल. तुम्ही पुरोगामी असाल-प्रतिगामी असाल किंवा ‘सोयिस्कर’ तटस्थ असाल. तुम्ही माझा द्वेष करत असाल किंवा तुम्हाला माझ्याबद्दल ‘सहवेदना’ असेल.तुम्हाला माझी बाजू पटत असेल किंवा तुम्ही माझ्या विरोधकांच्या बाजूनं असाल किंवा कन्फ्यूज्ड असाल. काहीही असेल, तरीही हा किरण माने पॅटर्न तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे”, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कुठलंच प्रॉडक्शन हाऊस हिम्मत करणार नाही!

पुढे किरण माने म्हणतात, “तुम्ही स्ट्रगलर असाल किंवा नाववाले असाल, तरी मी तुमच्या हक्कासाठी लढतोय हे लक्षात ठेवा. किरण माने पॅटर्न कलाकारांच्या न होणार्‍या एकजुटीला पर्याय आहे. माझ्या लढाईत मी जिंकल्यानंतर, तुम्हाला एका फोनवर उद्यापासून तू या सिरीयलमध्ये-नाटकात नसशील. असं सांगायची कुठलंच प्रॉडक्शन हाऊस हिम्मत करणार नाही. तुम्ही स्त्री असाल तर कुठलाही पुरूष तुमच्याशी सेटवर गैरवर्तन करायला धजावणार नाही. तुम्ही पुरूष असाल तर तुमचा कुठलाही हितशत्रू, कुठल्याही स्त्रीच्या आडून तुमच्यावर खोट्या-बेसलेस ‘गैरवर्तना’च्या आरोपाचं कटकारस्थान करण्याची हिम्मत करणार नाही. कुठलीही भगिनी कुणावरही खोटे आरोप करताना हजार वेळा विचार करेल”, असंही किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तुमचा ‘आवाज’ दाबायला कोण माईचा लाल समोर येणार नाही!

सेटवर सर्वांसमोर तुमची जात उघड करताना तुम्हाला लाज वाटणार नाही. किंवा कुणी तुमच्यापुढे आपल्या जातीचा तोराही मिरवायची छाती करणार नाही. जातपात हा प्रकार बाजूला ठेवून फक्त माणूस आणि त्याची गुणवत्ता जोखली जायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुमची जी काही विचारधारा असेल-राजकीय विधानं असतील, ती सोशल मिडीयावर मांडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. तुमचा ‘आवाज’ दाबायला कोण माईचा लाल समोर येणार नाही, असंही किरण माने यांनी प्रकर्षाने अधोरेकित केलं आहे.

“मी आणि माझे वकील असिम सरोदे अशा तीन कायदेशीर बाबींवर बोलणार आहोत, ज्या आपल्या क्षेत्रात कायम दुर्लक्षिल्या गेल्यात. पण आता माझ्यामुळे ते कायदे प्रॉडक्शन हाऊसला अतिशय अडचणीत आणणार आहेत. सगळी शक्ती पणाला लावूनही त्यातून मार्ग काढणं त्यांना महामुश्कील होणार आहे. हे मुद्दे माझ्या केसला ‘युनिव्हर्सल’ बनवतात. तुम्ही या क्षेत्रातले आहात. तुम्हाला माहितीये मी कुणाशी लढतोय. माझ्या करीयरचा बळी जाऊ शकतो. पण नंतर तुम्ही ‘तरणार’ आहात हे लक्षात घ्या.”

हिंदी प्रॉडक्शन हाऊसेसनी मराठीत येऊन खूप घाण केली

“काही हिंदी प्रॉडक्शन हाऊसेसनी मराठीत येऊन खूप घाण केलेली आहे. त्यांचे ‘हेड ऑफ प्रॉडक्शन’ आणि ‘प्रॉडक्शन कंट्रोलर’ अशा पोस्टवरची अनेक ऐशआरामी-छंदीफंदी-व्यसनी ‘रंगीले रतन’ मराठीतलं ‘चालचलन’ बिघडवतायत… त्या माजोरड्यांना हा मेसेज गेला पायजे की एखादा ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल, मन लावून काम करु. मेहनतीला कमी नाय पडणार.. पण तुमच्या काळ्या कृत्यांना मोकळं रान मिळावं म्हणून प्रामाणिक कलाकाराला विनाकारण छळू पहाल-दडपू पहाल, तर हा महाराष्ट्र आहे भावांनो… छ.शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांनी आमच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची घातलंय. आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत… आमचा नाद करु नका, असंही सरतेशेवटी किरण माने यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Varun Sharma : पहिल्याच ‘फुकरे’ चित्रपटात जिंकली प्रेक्षकांची मने, आता ‘सर्कस’च्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी खास मेजवानी!

Bhimsen Joshi : 11 व्या वर्षी घर सोडलं, गुरुच्या आशीर्वादाला बक्षीस मानलं, पं. भीमसेन जोशी ‘असे’ बनले भारतरत्न!

परश्यासोबत आधी डेटवर गेली, आता आर्ची म्हणते, “दुनिया है मेरे पिछे लेकीन मैं…!”

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.