AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

सध्या राज्यात वक्फ बोर्ड आणि परीक्षेदरम्यान बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी हे दोन मुद्दे चांगलेच तापले आहेत, यावर बोलताना पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं....
| Updated on: Feb 05, 2025 | 4:47 PM
Share

राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध होत आहे.  तसेच राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे, या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते श्रीगोंदा येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

जिहाद्यांचा या उन्माद आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोकांना धीर देण्यासाठी ताकद देण्यासाठी मी इथं आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,  हिंदूंच्या ताकदीने हे सरकार स्थापन झालं आहे. या सरकारच्या काळात हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.  दरम्यान सध्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलं की,  ‘पीर बाबाची नाटकं कशाला पाहिजेत? पैगंबर यांना मानणारा मुळ मुस्लिम जमाज देखील पीर बाबाला मानतो का? वक्फ बोर्डाचा विषय आमच्याकडे आहे. ही आमची राज्य सरकार व केंद्र सरकारची भूमिका आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र या मागणीला विरोध होत आहे, यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलं आहे. सरकार आमचं आहे, सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आमचा कारभार हा पारदर्शक व्हावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशी कीड देशात ठेवणार नाही, त्यांना जे दूध पाजणारे आहेत, त्यांनाही आम्ही ठेचू असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...