Nitesh Rane : नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग, ‘त्या’ चिठ्ठीने उडाली खळबळ
मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. ‘मोफत कपडे, बूट घ्या’ अशी चिठ्ठी असली तरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. बॉम्ब शोधक पथक व डॉग स्क्वॉडने तपास सुरू केला.

राज्यातील माहपालिका निवडणुकांसाठी अवघे काहीच दिवस उरले असून त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहो. जागोजागी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र त्याच दरम्यान मुंबईत सकाळी मोठा गोंधळ उडाली. राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस अवस्थेत बॅग आढळल्याने खळबळ माजली. बंगल्याच्या बाहेरील फुटपाथवर एक सूटकेस बेवारस अवस्थत दिसली. या घटनेची माहित मिळताच सर्वजण सतर्क झाले. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला.
बॅग आणि सोबत सापडली चिठ्ठी
मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर एका कोपऱ्या काळ्या रंगाची बॅग आढळली. एक तरूण तिथे बॅग ठेवून पुढे निघून गेल्याचा एक सीसीटीव्हीदेखील समोर आला होता. एवढंचं नव्हे ग्रेईश कलरची, भिंतीला उभी टेकवून ठेवलेल्या त्या बॅगेत एक चिठ्ठी देखील पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. Please take free shoes and cloth म्हणजेच या बॅगेत काही कपडे आणि बूट आहेत, ते कोणीही मोफत घ्या असा संदेश चक्क त्या चिठ्ठीत लिहीण्यात आला होता.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
ही चिठ्ठी नेमकी कोणी लिहीली, मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर ही बॅग बेवारस अवस्थेत कोणी, कधी, का, ठेवली असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्या चिठ्ठीनंतरही या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. बॅगेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, बॉम्ब शोधक पथक तसेच डॉक स्क्वॉडही घटनास्थळी दाखल झाले. हे सर्व शासकीय बंगले असून तिथे अनेक मंत्र्यांची निवासस्थान आहेत. त्यामुळेच या बॅगेची ओळख पटवण्यासाठी, त्यात आणखी काही घातक किंवा संशयास्पद वस्तू नाही ना, याची पडताळणी करून याची खात्री पटवण्यासाठी पोलिसांचे पथक तिथे पोहोचले आहे.
ही बॅग खालून वरून सगळीकडून नीट तपासली जात असून खरोखर त्यात काही आक्षेपार्ह गोष्ट नाही याची तपासणी करण्यात येत आहे. बॅगेसोबत लिहीलेल्या चिठ्ठीचाही, ती लिहीणाऱ्याचाही शोध घेतला जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येईल. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसराची देखील पाहणी व तपासणी करण्यात येत आहे. ही बेवारस बॅग सापडल्यावर नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
