महाराष्ट्रात 36.09 टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात आकडे जाहीर

महाराष्ट्रात 36.09 टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. मात्र, हा आकडा गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरातमध्ये 41.37 टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे.

महाराष्ट्रात 36.09 टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात आकडे जाहीर
Malnutrition (Pixabay)

नवी दिल्लीः NITI आयोगाने नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, सर्वाधिक लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात 36.09 टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. मात्र, हा आकडा गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरातमध्ये 41.37 टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे.

तर, पश्चिम बंगालमध्ये  33.62 टक्के, कर्नाटकमध्ये 33.56 टक्के आणि तेलंगणात 31.10 टक्के लोक संख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत. एखादं कुटुंब पोषणदृष्ट्या वंचित मानले जाते, जर त्या घरात 0 ते 59 महिने वयोगटातील कोणतेही बालक किंवा 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिला किंवा 15 ते 54 वर्षे वयोगटातील पुरुष कुपोषित असल्याचे आढळते.

MPI चे 12 निर्देशांक

अहवालात म्हटले आहे की, भारताच्या MPI मध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमाना हे तीन समान परिमाण मानले जातात. हे 12 निर्देशकांद्वारे दर्शविले जातात, ते म्हणजे पोषण, बाल आणि किशोरवयीन मृत्यू, प्रसूतीपूर्वची काळजी, शालेय शिक्षणाची वर्षे, शाळेतील उपस्थिती, स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, घरे, मालमत्ता आणि बँक खाती.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, “भारताच्या राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा (development in Multidimentional Poverty Index)) विकास हा सार्वजनिक धोरण लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण योगदान आहे.

इतर बातम्या-

नव्या कोरोना विषाणूनं जगाला पुन्हा धडकी, नेमका किती घातक आहे ओमीक्रॉन?

नकोशीला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार


Published On - 1:38 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI