हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक, ठाणे-वाशी-नेरुळ मार्गावर एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेवर NO MEGA BLOCK

रविवारी 30 जुलै रोजी मध्य(CENTRAL RAILWAY) आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर(Harbor and Trans Harbour) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक, ठाणे-वाशी-नेरुळ मार्गावर एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेवर NO MEGA BLOCK
वनिता कांबळे

|

Jul 29, 2022 | 10:12 PM

मुंबई : रविवार म्हटलं की रेल्वे प्रवाशांना एकच टेन्शन असतं ते म्हणजे मेगा ब्लॉक(MEGA BLOCK). प्रत्येक रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जातो. अभियांत्रिक कामासाठी घेतल्या जाणाऱ्या या मेगाब्लॉक मुळे रल्वेचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडते. रविवारी 30 जुलै रोजी मध्य(CENTRAL RAILWAY) आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर(Harbor and Trans Harbour) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉग दरम्यान हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला पर्यंतची वाहतूक बंद राहणार आहे. तर, ठाणे वाशी आणि ठाणे नेरुळ(Thane-Vashi-Nerul) या ट्रान्स हार्बर मार्गावर एकही लोकल धावणार नाहीच. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुर्ला मार्गे प्रवास करावा लागणार आहे.

मध्ये आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नाही

मध्ये आणि पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. असे रेल्वे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

हार्बर लाइनवर CSMT ते चुनाभट्टी आणि CSMT ते वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी-नेरुळ मार्गावर एकही लोकल धावणार नाही

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणार्‍या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

कुर्ला येथून विशेष लोकल तर प्रवाशांना मेन लाईनवरुन प्रवासाची परवानगी

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान दर २०मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें