AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता या लोकांना विधानभवनात प्रवेश बंद म्हणजे बंद, कालच्या राड्यानंतर नार्वेकरांचा मोठा निर्णय

गुरुवारी विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, पडळकर आणि आव्हाड समर्थक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं, या गोंधळानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आता या लोकांना विधानभवनात प्रवेश बंद म्हणजे बंद, कालच्या राड्यानंतर नार्वेकरांचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 3:36 PM
Share

गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला, भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले, प्रकरण शिविगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचलं. हा राडा चक्क विधानभवनाच्या लॉबीमध्ये झाल्यानं आता या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून घेण्यात आली आहे. या राड्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आमदारांना चांगलंच सुनावलं आहे, तसेच मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगत आहे, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे. आमदारांचे वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे.  म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठीत केली जाईल,  याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापुढे आता विधानभवनात अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब आहे, आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत दे बोलतो ते गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. म्हणून यापुढे फक्त आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच  बहुतेक वेळा मंत्री विधीमंडळात बैठक घेतात,  पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही यावेळी नार्वेकर म्हणाले आहेत.

दरम्यान यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.  मी सभागृहात एकटाच येतो, मी कुणाच्या पासवर सही करत नाही, चुकीचे रेकॉर्ड वर येऊ नये. मी घटना घडली तेव्हा सभागृहात नव्हतो. माझा घटनेशी कुठलाही संबंध नाही. मी कुणाला खुनावले ही नाही. या लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जीवंत आहे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. मला धमक्या येत होत्या हे मी काल सांगितले, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत