AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : रात्रीच्या अंधारात मनोज जरांगेंनी सरकारबरोबर.. सेटलमेंटचा मोठा आरोप

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 20 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आंदोलन मागे घेतलं आहे. त्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil : रात्रीच्या अंधारात मनोज जरांगेंनी सरकारबरोबर.. सेटलमेंटचा मोठा आरोप
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 17, 2026 | 1:21 PM
Share

मागच्या 20 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. सरकारच्यावतीने राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि दादा भुसे यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली. मनोज जरांगे यांनी आता तीन महिन्यांचा 90 दिवसांचा अवधी दिला आहे. मीडियासमोर सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील यांनी इतर समाजांना कसे आरक्षण मिळते, पण मराठ्यांवर कसा अन्याय होतो हे प्रखरपणे मांडलं. “मनोज जरांगेंनी परत एकदा समाजाचा विश्वासघात केला आहे. रात्रीच्या अंधारात सरकार बरोबर साटंलोट केलं. मोठी सेटलमेंट केलेली आहे. मोठमोठ्या बाता मारणारा मनोज जरांगे आता का मागे हटला?” अशा शब्दात ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी टीका केली.

“मराठा समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. याच्या 15 ते 20 दिवसाच्या आंदोलनामध्ये तीन मराठा बांधवांचा जीव गेला आहे. त्याला जबाबदार कोण?” असा सवाल ससाणे यांनी विचारला. “सरकार ओबीसी आंदोलकांवर कारवाई करते, याला कधी बेड्या घालणार? मनोज जरांगेंनी सातत्याने शिवीगाळ करून माता, माऊलींच्या भावना दुखावल्या आहेत, याच्यावर गुन्हा दाखल करायलाच लावणार” असं मंगेश ससाणे म्हणाले.

जरांगे नावाचा पोपट हा कधीच संपलेला होता

“मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पोपट कधीच मेलेला होता. पण या पोपटाला खतपाणी देऊन, दाणे टाकून मोठं करण्याचं काम महाराष्ट्रातल्या काही नेतेमंडळींनी केलं. जरांगेंच्या बेकायदा मागणीला कायमच आमदार, खासदार सपोर्ट करत राहिले. त्यामुळे मनोज जरांगे हा सरकारच्या मानगुटी वरती बसला होता. त्यामुळे हे भूत एकदा मानगुटीवरुन खाली उतरायचं. मनोज जरांगे नावाचा पोपट हा कधीच संपलेला होता. मी मुंबईला गेलो तर आपल्याला कोणीही भीख घालणार नाही, या भीतीपोटी मनोज जरांगे याने हे आंदोलन मागे घेतले आहे. मी यापूर्वीही सांगितलं होतं जरांगे मुंबईला जाणार नाही” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

Follow Us
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!